शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

एका लग्नाची गोष्ट! 55 वर्षीय नवरदेव आणि 25 वर्षांची वधू; सर्वच करताहेत या विवाहाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 14:32 IST

नवरदेवाचे वय 55 वर्षे आहे आणि नववधूचे वय त्यापेक्षा निम्मे म्हणजेच 25 वर्षे आहे. पण असं असताना तरुणीशी लग्न करणाऱ्या 55 ​​वर्षीय व्यक्तीचे गावात भरभरून कौतुक होत आहे.

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात झालेला एक विवाह सध्या चर्चेत आला आहे. कारण नवरदेवाचे वय 55 वर्षे आहे आणि नववधूचे वय त्यापेक्षा निम्मे म्हणजेच 25 वर्षे आहे. पण असं असताना तरुणीशी लग्न करणाऱ्या 55 ​​वर्षीय व्यक्तीचे गावात भरभरून कौतुक होत आहे. दौसा जिल्ह्यातील लालसोटच्या नवरंग पुरा गावात राहणारा बल्लू राम उर्फ ​​बलराम याचा विवाह नापाच्या बास येथे राहणाऱ्या विनितासोबत 3 मे रोजी मोठ्या थाटामाटात झाला. आता या लग्नाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. 

लग्नामागचे कारणही आश्चर्यकारक असल्याचे सांगितले जात आहे. वधू अपंग असून तिला चालता येत नाही, तर बल्लू राम पूर्णपणे निरोगी आहे. गेल्या 31 वर्षांपासून बल्लू गावातील मंदिरात शंकराची पूजा करण्यात मग्न असून भोले बाबांवरील भक्तीमुळे त्यांच्या मनात लग्नाचा विचार कधीच आला नसल्याचे सांगण्यात आले. बल्लू रामला सात बहिणी आणि भाऊ आहेत, पण वयाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईक बल्लूसाठी मुलगी शोधू लागले.

एके दिवशी बल्लूला कळले की नापाच्या बास येथे राहणारी विनीता अपंग आहे आणि तिचे लग्न होत नाही. अशा परिस्थितीत 31 वर्षे भोले बाबांची सेवा करणाऱ्या बल्लू रामने विनितासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. विनिताच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, विनिता 12 वर्षांची असताना अंगणातील झाडावरून खाली पडल्याने तिचा पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला होता. तिच्यावर वर्षानुवर्षे उपचार झाले, पण विनिताच्या पाठीच्या खालच्या भागाने काम करणे बंद केले. मुलीच्या अपंगत्वामुळे तिचे लग्न होऊ शकले नाही.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तिच्यासाठी एक स्थळ आलं होतं. पण तो मुलगाही अपंग होता. अशा परिस्थितीत विनीता यांची काळजी कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाला होता. मग बल्लू रामचं नातं आलं तेव्हा आम्ही होकार दिला. दोन्ही कुटुंबीयांनी बल्लू आणि विनीता यांचे नाते निश्चित केले आणि त्यानंतर 3 मे रोजी दोघांनीही पूर्ण विधी करून लग्न केले. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबे तसेच संपूर्ण गावातील लोक खूप आनंदी आहेत. गावातील लोक बल्लू रामचे कौतुक करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :marriageलग्न