५०० कर्मचारी भरतीला सहकाची मंजुरी एकनाथराव खडसे: रेल्वे स्थानकावर स्वागत ; जिल्हा बॅँकेत तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2016 18:28 IST
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत ५०० कर्मचार्यांची भरती करण्यास सहकार विभागाने मान्यता दिली आहे. या माध्यमातून सध्या असलेल्या कर्मचार्यांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात दिली.
५०० कर्मचारी भरतीला सहकाची मंजुरी एकनाथराव खडसे: रेल्वे स्थानकावर स्वागत ; जिल्हा बॅँकेत तोबा गर्दी
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत ५०० कर्मचार्यांची भरती करण्यास सहकार विभागाने मान्यता दिली आहे. या माध्यमातून सध्या असलेल्या कर्मचार्यांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचारी, अधिकार्यांच्या पतसंस्थेतर्फे आयोजित वार्षिक सभा व कर्मचारी व त्यांच्या पाल्यांच्या सत्कार सोहळ्यास एकनाथराव खडसे यांची उपस्थिती होती. बॅँकेचे धाडसी कर्मचारी, त्यांचे पाल्य तसेच हिंदी साहित्यातील राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या प्रा. उर्मिला पाटील यांचा यावेळी खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कर्मचार्यांचे परिश्रमयावेळी बोलताना खडसे म्हणाले, बॅँक सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. बॅँकेच्या या वाटचालीत कर्मचार्यांचे सर्वात जास्त परिश्रम आहेत. अवघे धरू सुपंथ अशीच या बॅँकेची वाटचाल केवळ कर्मचार्यांमुळे आहे. राज्यातील १२ बॅँकांचे लायसन्स रद्द झाले. ११ बॅँका क वर्गात होत्या. राज्यात केवळ सात ते आठ जिल्हा बॅँका जिवंत आहेत. त्यात जळगाव जिल्हा बॅँकेचा समावेश असल्याचा आपणास अभिमान असून त्याचं श्रेय तुम्हाला आहे. बॅँकेच्या ठेवी २६५० कोटींवर गेल्या त्या तीन हजार कोटींपर्यंत नेण्याचा आपणास प्रयत्न करायचा आहे. ५०० कर्मचारी भरतीबॅँकेत कर्मचारी कमी आहेत. अनेक वर्षात भरती झाली नाही हे लक्षात घेऊन सहकार विभागाकडे या संदर्भात मागणी केली होती. ५०० कर्मचार्यांची भरती करण्यास मान्यता मिळाली आहे. किमान ४०० कर्मचारी तरी भरती करून असलेल्या कर्मचार्यांवरील भार कमी करण्याचा प्रयत्न आहे. कर्मचार्यांचा पंतप्रधान विमा योजनेत विमाही उतरवून घेण्यात आला आहे. तसेच संचालक मंडळाची विशेष सभा घेऊन आणखी काही कर्मचार्यांना देता येईल काय? असे प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.