शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्लबच्या लॉकरमध्ये ५०० कोटींचे घबाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:32 IST

बॉवरिंग इन्स्टिट्यूट या श्रीमंती क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवरील तीन लॉकर्समध्ये कोट्यवधी रुपयांचे घबाड मिळाल्याने खळबळ

बंगळुरू: येथील सेंट मार्क्स रोडवरील बॉवरिंग इन्स्टिट्यूट या श्रीमंती क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवरील तीन लॉकर्समध्ये कोट्यवधी रुपयांचे घबाड मिळाल्याने खळबळ उडाली आहे.बांधकाम उद्योगात मोठी गुंतवणूक असलेल्या अविनाश अमरलाल कुकरेजा यांचे हे घबाड असल्याचे कळते. क्लबच्या व्यवस्थापनाने आधी पोलिसांना व त्यांच्यामार्फत प्राप्तिकर विभागास खबर दिल्यानंतर लॉकर्समधील हे सर्व सामान जप्त करून कुकरेजा यांची चौकशी सुरू केली आहे.बॅडमिंटन कोर्टवरील तीन लॉकर्समध्ये हे घबाड मिळाले. त्यात ५०० कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तांची कागदपत्रे, ७.८ कोटी रुपयांचे रत्नजडित दागिने, ३.९ कोटी रुपयांचे परकीय चलन, दोन हजार रुपयांच्या १.८ कोटींच्या नव्या नोटांची बंडले व २० लाख रुपये किंमतीची सोन्याची ६५० ग्रॅम वजनाची बिस्किटे यांचा समावेश आहे.कुकरेजा यांचे कुटुंब मुळचे राजस्थानमधील आहे. अविनाश क्लबचे सभासद असून त्यांनी हे तीन लॉकर अवैधपणे बळकावले होते, असे सूत्रांनी सांगितले. अविनाश यांचे क्लबमध्ये येणे अधूनमधन असले तरी त्यांच्या आई मात्र क्लबमध्ये पत्ते खेळण्यासाठी येत, असेही सांगण्यात आले. क्लबमध्ये टेनिस, बॅडमिंटन यासारख्या खेळांची सोय असून अशा प्रत्येक ठिकाणी स्वच्छतागृहांशेजारी लॉकर आहे. बरेच लॉकर वर्षानुवर्षे बंद असल्याचे आढळल्याने क्लबने सर्व सभासदांना लॉकर उघडून त्यातील सामानाची ओळख पटवावी, असे सांगितले होते.ज्या सभासदांनी लॉकर स्वत:हून उघडले नाहीत, ते क्लबच्या व्यवस्थापनातर्फे उघडण्यात आले. या तीन लॉकर्समध्ये हे घबाड मिळाल्यानंतर ते कडीकुलपात ठेवले गेले. नंतर पोलिसांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत त्या संपत्तीची मोजदाद करण्यात आली. (वृत्तसंस्था).

टॅग्स :MONEYपैसाBengaluruबेंगळूर