शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात यावर्षी ५० अतिरेक्यांना केले ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 04:06 IST

लॉकडाऊनमध्ये १८ अतिरेकी मारले; चकमकीत १७ जवान शहीद

जम्मू : जम्मू-काश्मिरात यावर्षी आतापर्यंत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या अनेक कमांडरसह ५० अतिरेकी मारले गेले आहेत. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, अतिरेक्यांविरुद्धच्या मोहिमेत या काळात १७ जवान शहीद झाले आहेत.अतिरेक्यांनी गत चार महिन्यांत ९ जणांची हत्या केली आहे. यातील १८ जण हे लॉकडाऊनच्या काळात मारले गेले आहेत. १५ मार्च रोजी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दियालगाम भागात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत लष्करचा जिल्हा कमांडर मुजफ्फर अहमद भट याच्यासह चार अतिरेकी ठार झाले होते.२५ जानेवारी रोजी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात त्राल भागात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी मारले गेले होते. यात जैशचा स्वयंभू काश्मीर प्रमुख कारी यासीर याचाही सहभाग होता. २३ जानेवारी रोजी अन्य एक कमांडर अबू सैफुल्ला हा पुलवामा जिल्ह्यात मारला गेला होता.९ एप्रिल रोजी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सोपोरमध्ये सुरक्षा दलाने जैशचा कमांडर सज्जाद नवाब डार याला ठार मारले होते. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर हारुण वानी हा १५ जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या डोडा गुंडाना भागात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता.या काळात अतिरेक्यांनी ९ सामान्य नागरिकांची हत्या केली, तर १७ जवान शहीद झाले. यात १३ सुरक्षारक्षक, तीन विशेष पोलीस अधिकारी आणि एक पोलीस यांचा समावेश आहे. पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले की, गतवर्षी जम्मू-काश्मीरमध्ये १६० अतिरेकी मारले गेले होते आणि १०२ अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती.राजौरी जिल्ह्यात पाककडून तोफमारापाकिस्तानच्या लष्कराने शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील ठाणी आणि खेड्यांत तोफमारा केला. या माºयाला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले, असे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले.सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पाकिस्तान लष्कराने राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये कोणतेही कारण नसताना शस्त्रसंधीचे उल्लंघन करून छोट्या शस्त्रांतून गोळीबार आणि उखळी तोफांतून मारा सुरू केला. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने गोळीबार आणि तोफामारा करण्याचा हा सलग १७ वा दिवस आहे.अपहृत पोलिसाची सुटकाकाश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात घरातून अपहरण करण्यात आलेल्या एका पोलिसाची अतिरेक्यांनी सुटका केली आहे. कॉन्स्टेबल जावेद जब्बार यांना गुरुवारी रात्री अतिरेक्यांनी घरातून उचलून नेले होते. त्यानंतर काही तासांत त्यांची सुटका करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुटी घेऊन जावेद हे आपल्या घरी आले असताना गुरुवारी रात्री ९.४० वाजता त्यांचे अपहरण झाले होते.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर