शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुडा झाला, मंडप सजला पण नवरदेव आलाच नाही; कारण दुसऱ्या पक्षाने 50 लाख हुंडा दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 11:48 IST

नवरदेवाच्या अचानक अशा वागण्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे, मात्र लग्न न झाल्याची विचित्र घटना गोरखपूरमध्ये समोर आली आहे. दुसऱ्या पक्षाकडून हुंड्यात कितीतरी पटीने जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाने पहिले लग्न मोडलं. 10 मे रोजी हे लग्न होणार होतं. मुलीच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. सगळे नातेवाईक जमले होते.याच दरम्यान, नवरदेवाच्या अचानक अशा वागण्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गोरखनाथ परिसरातील आहे. यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसांकडे मदतीचे आवाहन केले आहे. गोरखनाथ परिसरातील विकास नगर, बरगडवा येथील एका मुलीचे लग्न चिलुआताल भागातील राप्तीनगर येथील अरुण उपाध्याय यांचा मुलगा प्रशांत उपाध्याय याच्यासोबत निश्चित झाले होते. साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर 10 मे रोजी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. मात्र शेवटच्या क्षणी मुलांनी लग्नास नकार दिला. 

पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, मुलांनी हुंड्याची रक्कम घेतली आणि गाडीची रक्कमही घेतली. पण, दुसऱ्या पक्षाकडून 50 लाख हुंड्याची ऑफर आल्याने त्यांनी दुसऱ्या ठिकाणी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलीने तिच्या माहेरच्या नातेवाईकांसह मुलाच्या घरी पोहोचून लग्न न करण्याचे कारण विचारले. त्यावर त्याला अन्य पक्षाकडून एकूण 50 लाखांचा हुंडा मिळत असल्याचे सांगण्यात आले. 

जास्त हुंडा मिळत असल्याने ते लग्न करू शकत नाहीत. यानंतर मुलीच्या घरच्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत ​​त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांच्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी तरुण प्रशांत उपाध्याय, त्याचे वडील अरुण उपाध्याय आणि आई नलिनी उपाध्याय यांच्याविरुद्ध चिलुआतल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक जयंत कुमार सिंह यांनी सांगितले की, चिलुआतल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. 

टॅग्स :marriageलग्न