शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

गुजरातमधील प्रमुख पक्षांच्या ५० टक्के उमेदवारांकडे नाही पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 06:47 IST

डॉक्टर, इंजिनीअर, उच्चशिक्षितही; पाचवीत शाळा सोडलेलाही निवडणुकीच्या आखाड्यात

अहमदाबाद : गुजरातमध्ये भाजप व कॉँग्रेसच्या ५२ पैकी २५ उमेदवारांकडे साधी पदवीही नाही. मात्र डॉक्टर, इंजिनीअर असे उच्चशिक्षित उमेदवारही रिंगणात आहेत. सुरेंद्रनगरमध्ये एका डॉक्टरची लढत पाचवीतच शाळा सोडलेल्या उमेदवाराशी होणार आहे.

गुजरातमधील २६ जागांसाठी येत्या २३ एप्रिलला मतदान होत आहे. भाजप, कॉँग्रेसच्या ५२ उमेदवारांपैकी निम्मे म्हणजे २५ उमेदवार पदवीधरही नाहीत. यात भाजपचे १४ तर कॉँग्रेसचे ११ उमेदवार आहेत. कॉँग्रेसचे चार तर भाजपच्या एकाने एसएससीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केलेले नाही.

भाजपचे किरीट सोळंकी (अहमदाबाद पश्चिम), के. सी. पटेल (बलसाड) तर कॉँग्रेसचे तुषार चौधरी (बार्डाेली) हे एम.बी.बी.एस. आहेत. पर्बत पटेल (बनासकांठा), भारतसिंह दाभी (पाटण) हे भाजपचे उमेदवार वकील आहेत. आणंद मतदारसंघातून लढणारे भाजपचे मितेश पटेल व कॉँग्रेसचे भारतसिंह सोळंकी हे इंजिनीअर आहेत. भाजपचे देऊसिंह चौहान (खेडा) व प्रभू वसावा (बार्डाेली) हे दोघेही इंजिनीअरच आहेत.भावनगरच्या भाजप उमेदवार भारतीबेन सियाल या आयुर्वेदाच्या डॉक्टर (बीएएमएस) आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणEducationशिक्षण