शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी महिला एजंटकडून 50 भारतीय जवान हनी ट्रॅप? चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 10:41 IST

आयएसआयकडून फेसबुक अकाऊंट ऑपरेट होत असल्याची शक्यता; संशयित फेसबुक अकाऊंटच्या फ्रेंड लिस्टमध्ये 50 भारतीय जवान

नवी दिल्ली: भारतीय लष्कराचे 50 जवान हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या जवानांकडून लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे लष्करानं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी सोमवीर नावाच्या जवानाला पोलीस आणि लष्करानं शुक्रवारी अटक केली. सोमवीरनं एका पाकिस्तानी तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील माहिती दिल्याचा संशय आहे. सोमवीर व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून एका तरुणीच्या संपर्कात होता. सोमवीर संबंधित महिलेसोबत फेसबुकवरुनही संपर्क साधायचा. अनिका चोप्रा या नावानं या महिलेचं फेसबुकवर अकाऊंट असल्याची माहिती समोर आली. हे अकाऊंट पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयकडून चालवलं जात असल्याचा संशय लष्कराला आहे. अनिका चोप्रांच्या फ्रेंडलिस्टमध्ये सोमवीरसोबत 50 भारतीय जवानांचा समावेश आहे. त्यामुळे या जवानांनादेखील हनी ट्रॅप करण्यात आलं असावं, असा संशय लष्कराला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. भारतीय लष्करासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली सोमवीरला शुक्रवारी जैसलमेरमधून अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ पाच हजार रुपये आणि अश्लील छायाचित्रांच्या बदल्यात या जवानानं देशाशी गद्दारी केल्याचं उघड झालं आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला हादरवणाऱ्या या हनिट्रॅपच्या प्रकरणाची सुरुवात सोशल मीडियावरून झाली होती. हाय हॅलोच्या माध्यमातून जवान सोमवीर आणि पाकिस्तानी महिला एजंटमध्ये संवादाची सुरुवात झाली. या महिलेनं सोमवीरला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी काही अश्लील छायाचित्रं पाठवली होती. त्याबदल्यात या जवानानं  लष्कराशी संबंधित माहिती, टँक, हत्यारबंद वाहने, हत्यारे आणि लष्करी कंपन्यांच्या स्थितीबाबतची माहिती या महिलेला पुरवली. यानंतर या महिलेने त्याला पाच हजार रुपयेही दिले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानISIआयएसआय