शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

क्रूरता; मुंबईतून बेपत्ता झालेल्या चिमुरडीचा मृतदेह गुजरातमध्ये सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 15:41 IST

चिमुरडीचा गुजरातमधील नवसारी रेल्वे स्टेशनवर ट्रेनच्या स्वच्छतागृहात मृतदेह सापडला आहे.

मुंबई- नालासोपऱ्यातील घराजवळून एका पाच वर्षांच्या चिमुरडीचं शनिवारी अपहरण झालं होतं. या चिमुरडीचा गुजरातमधील नवसारी रेल्वे स्टेशनवर ट्रेनच्या स्वच्छतागृहात मृतदेह सापडला आहे. त्या चिमुरडीला गळा दाबून मारण्यात आल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे. अंजली सरोज असं मुलीचं नाव असून ती नालासोपाऱ्यातील साई अर्पण इमारतीत तिच्या कुटुंबासह राहत होती. पोलिसांनी इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सापडलेल्या अपहरणकर्त्यांच्या फुटेजवरून आरोपीचं रेखाचित्र जारी केलं आहे. शनिवारी संध्याकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एक महिला अंजलीला जबरदस्तीने ओढून घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते आहे. रविवारी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्या महिलेचं रेखाचित्र केल्यानंतर रविवारी रात्री मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर समजाण आहे. प्राथमिक तपासात मुलीची हळा दाबून हत्या केल्याचं समोर येतं आहे. दरम्यान, आरोपी महिला नालासोपारा रेल्वे स्टेशनवर जवळपास एक-दीड तास होती. रेल्वे स्टेशनवरील काही किलोमीटर अंतरावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला एकटी जाताना दिसते आहे. आरोपी महिला त्याच भागातील राहणारी असू शकते व ती मुलीला आधीपासून ओळखत असावी, असं पोलीस अधिकारी जयंत बजबले यांनी सांगितलं आहे. आरोपीच्या रेखाचित्रावरून मुलीच्या वडिलांना आरोपीची ओळख पटलेली नाही. शनिवारी संध्याकाळी अंजली जेव्हा इतर चार-पाच मुलांबरोबर बाहेर खेळत होती तेव्हा अपहरणकर्ती महिला इमारतीच्या बाजूला बसली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. या महिलेने मुलांना चॉकलेट देऊन भुरळ घातली. त्यानंतर ती मुलंही महिलेशी बोलायला लागली. त्यानंतर आरोपी महिलेने अंजलीचा हात धरला व तिला घेऊन गेली. तिच्या मागे इतर मुलंही गेली. पण रस्ता क्रॉसिंगच्या वेळी महिलने मुलांना आणखी चॉकलेट आणायला पैसे दिले व अंजलीला घेऊन पुढे गेली. 

रस्ता क्रॉसिंगजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपी महिला अंजलीचा हात धरून जाताना दिसते आहे. अपहरणकर्त्या महिलेला अंजलीलाच घेऊन जायचं होतं हे अंजलीसोबत असलेल्या इतर मुलांकडून समजतं आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. शनिवारी रात्री 8.45 च्या सुमारास अंजली घरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांनी शोधायला सुरूवात केली. तेव्हा अंजलीला एक महिला घेऊन गेल्याचं तिच्यासोबत खेळत असलेल्या मुलांनी सांगितलं. 

दरम्यान, पोलीस नालासोपारा ते नवसारीपर्यंतच्या रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. अपहरणकर्ती महिला अंजलीच्या कुटुंबाला ओळखत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबई