शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
4
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
5
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
6
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
7
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
8
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
9
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
10
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
11
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
12
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
13
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
14
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
16
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
17
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
18
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
19
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
20
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!

त्यांचे पाच खासदार कधीही राजीनामा देऊ शकतात; भाजप नेत्याच्या दाव्यानं खळबळ

By कुणाल गवाणकर | Updated: November 21, 2020 19:03 IST

West Bengal polls 2021: भाजप खासदाराच्या दाव्यामुळे सत्ताधारी पक्षात खळबळ

कोलकाता: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकारण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय मानले जाणारे तृणमूलचे दिग्गज नेते शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी तृणमूलचे वरिष्ठ खासदार सौगत रॉय यांच्यासह ५ खासदार कधीही राजीनामा देऊन भाजपमध्ये येतील, असा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.पश्चिम बंगालमधल्या डमडमचे खासदार सौगत रॉय यांच्यासह ५ लोकसभा सदस्य लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा अर्जुन सिंह यांनी केला आहे. सिंह भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून ते लोकसभेत बॅरकपूर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. सौगत रॉय तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात ते मंत्री होते. ते चौथ्यांदा खासदार असून त्याआधी त्यांनी ५ वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे.अर्जुन सिंह यांनी २४ परगणा जिल्ह्यातल्या जगदल घाटावरील छठ पूजेत सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी तृणमूलला लवकरच मोठं खिंडार पडणार असल्याचे दावे केले. 'शुभेंदू अधिकारी एक मोठे नेते आहेत. शुभेंदू आणि त्यांच्यासारख्या इतर नेत्यांनी संघर्ष केल्यामुळेच ममता बॅनर्जी मोठ्या नेत्या झाल्या. त्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली आहे. मात्र आता ममता त्यांचं योगदान विसरल्या आहेत. स्वत:च्या भाच्याला खुर्चीत बसवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ममता यांनी शुभेंदू यांच्यासारख्या नेत्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडायला हवा,' असं सिंह म्हणाले.सौगत राय यांचं सिंह यांना उत्तरतृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी सिंह यांच्या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. अर्जुन सिंह बाहुबली नेते आहेत. त्यांचा अनेक बेकायदेशीर आर्थिक व्यवहारात हात आहे. ते काहीही बोलू शकतात. मीदेखील भाजप प्रवेशासाठी रांगेत उभा असल्याचा त्यांचा दावा आहे. पण मी मेलो तरीही भाजपमध्ये जाणार नाही, असं रॉय यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :BJPभाजपाtmcठाणे महापालिका