शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

केजरीवालांच्या नेतृत्वात 'आपने' 200 पेक्षा जास्त जागा लढवल्या, तिन्ही राज्यात मिळाला भोपळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 15:52 IST

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात AAP ने निवडणूक लढवली, मात्र अनेक ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले.

5 state assembly election 2023: आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू आहे. यातील मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने सत्ता खेचून आणली आहे, तर  तेलंगणात पहिल्यांदाच काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे. या सर्व राज्यांमध्ये दिल्ली-पंजाबमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षानेही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली होती. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी स्वतः अनेक रॅली आणि रोड शो केले होते. मात्र, पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले.

दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर अरविंद केजरीवालांनीआपला मोर्चा इतर राज्यांकडे वळवला आहे. गेल्या वर्षी त्यांनी गुजरात विधानसभा निवडणूक लढवली, ज्यात त्यांना अपयश आले. आताही त्यांनी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश, या तीन हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे केले. आपने मध्य प्रदेशात 70 हून अधिक जागांवर, राजस्थानमध्ये 88 जागांवर आणि छत्तीसगडमध्ये 57 जागांवर उमेदवार उभे केले होते. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे या राज्यांमध्येही मोफत वीज, पाणी आणि शिक्षण देण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. अनेक मोर्चे आणि रोड शो करूनही 'आप'ला काही फायदा झाला नाही.

'आप'चे खाते उघडले नाही'आप'ने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये 200 हून अधिक उमेदवार उभे केले होते. मात्र, एकही जागा जिंकता आली नाही. बहुतांश जागांवर 'आप'च्या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. सिंगरौली नगराध्यक्ष आणि आपच्या उमेदवार राणी अग्रवाल यांचाही पराभव होताना दिसत आहे. याशिवाय टीव्ही अभिनेत्री चाहत पांडेचाही जामीन जप्त झाल्याचे समजते.

'आप'ला किती मते मिळाली?आम आदमी पक्षाने तेलंगणात उमेदवार दिले नाहीत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, छत्तीसगडमध्ये आम आदमी पक्षाला 0.97% मते मिळत आहेत. तर मध्य प्रदेशात 0.42% आणि राजस्थानमध्ये 0.37% मते मिळत आहेत.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३