शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

रणजीत सिंह हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीम याच्यासह 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 16:55 IST

Ram Rahim Singh: शिक्षेसह राम रहीमला 31 लाख आणि इतर 4 दोषींना 50-50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

पंचकुला:डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला रणजीत सिंह हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्यासह 4 आरोपींना विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने रणजीत सिंगच्या हत्येप्रकरणी राम रहीमसह 5 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम रहीमला 31 लाख आणि इतर 4 दोषींना 50-50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

रणजीत सिंह हत्या प्रकरणात दोषीडेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह साध्विंच्या लैंगिक शोषणात आधीच तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 10 जुलै 2002 रोजी रणजीत सिंह यांची हत्या झाली होती. या प्रकरणात गुरमीत राम रहीम सिंह दोषी आढळला आहे. सीबीआयने 3 डिसेंबर 2003 रोजी एफआयआर नोंदवला होता. 2017 मध्ये सीबीआय कोर्टाने गुरमीत राम रहीमसह 5 लोकांना दोषी ठरवलं. राम रहीम व्यतिरिक्त, कृष्ण लाल, अवतार, सबदील आणि जसबीर यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

राम रहिम इतर गुन्ह्यात दोषीसीबीआयच्या विशेष न्यायालयात न्यायाधीश डॉ.सुशील कुमार गर्ग यांनी सुमारे अडीच तासांच्या चर्चेनंतर आरोपीला दोषी ठरवलं होतं. दरम्यान, यापूर्वीच गुरमीत राम रहीमला साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा झाली आहे. याशिवाय तो पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

कलम 144 लागूआजच्या निर्णयामुळे पंचकुलामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र करण्याची परवानगी नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे धारदार शस्त्र बाळगण्यास बंदी आहे. आयटीबीपीच्या चार तुकड्या सीबीआय कोर्ट कॉम्प्लेक्स आणि चारही प्रवेशद्वारांवर तैनात केल्या जातील.

काय आहे प्रकरण ?कुरुक्षेत्रातील रहिवासी आणि डेराच्या उच्चस्तरीय व्यवस्थापन समितीचा सदस्य रणजीत सिंह याची 10 जुलै 2002 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गुरमीत राम रहीम, डेराचा तत्कालीन व्यवस्थापक कृष्ण लाल, अवतार, जसबीर आणि सबदील यांना पंचकुला येथील हरियाणा विशेष सीबीआय न्यायालयाने 8 ऑक्टोबर रोजी दोषी ठरवलं होतं. मारेकऱ्यांमध्ये पंजाब पोलिस कमांडो सबदील सिंग, अवतार सिंग, इंदरसेन आणि कृष्णलाल यांचा समावेश होता. रणजीत सिंहची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी वापरलेली शस्त्रे डेराच्या आश्रमात लपवली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाCourtन्यायालय