शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील ४४ जुनी स्थानके चकाकणार! देशातील ५०८ स्थानकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 08:32 IST

रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी प्रारंभ करीत असताना संबंधित लोकसभा मतदारसंघातील खासदार व केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागांतील रेल्वेस्थानकांवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी देशातील ५०८ जुन्या रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभ करणार आहेत. यात महाराष्ट्रातील ४४ जुन्या स्थानकांचा समावेश केला आहे. त्यांचा पुनर्विकास करून तेथे सिटी सेंटर व शॉपिंग मॉल विकसित केला जाणार आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी प्रारंभ करीत असताना संबंधित लोकसभा मतदारसंघातील खासदार व केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागांतील रेल्वेस्थानकांवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकाच वेळी एवढ्या रेल्वेस्थानकांवर हा कार्यक्रम आयोजित करून नवीन रेकॉर्ड केले जात आहेत. 

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनातील कक्षात भेट घेतली. वैष्णव यांनी सांगितले की, ५०८ रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासासाठी २४४७० कोटींची तरतूद केली आहे. 

‘अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत देशातील १३०९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे स्थानकावर शॉपिंग सेंटर, सिटी सेंटर...- या रेल्वेस्थानकांवर पुनर्विकासांतर्गत शॉपिंग सेंटर, शॉपिंग मॉल्स, सिटी सेंटर उभारण्यात येतील. रेस्टॉरंट, दुकाने, शोरूम, जिम्नॅशियमसुद्धा येथे असतील.- पुनर्विकासासाठी महाराष्ट्रातील ४४ रेल्वेस्थानकांची निवड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील ५५, राजस्थानमधील ५५, बिहारधील ४९, मध्य प्रदेशातील ३४, आसाममधील ३२, ओडिशामधील २५, पंजाबमधील २२, गुजरातमधील २१, झारखंडमधील २०, आंध्र प्रदेशातील १८, हरयाणातील १५ व कर्नाटकमधील १३ रेल्वेस्थानकांची निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे