शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 06:37 IST

महाराष्ट्रात ४८.१% ग्रामीण कुटुंबांकडे जमीन नाही; सामाजिक आणि ऐतिहासिक कारणांमुळे दरी वाढली; वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबचा धक्कादायक अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशातील आर्थिक विषमतेसोबतच आता जमिनीच्या मालकीमधील विषमतेचे वास्तव समोर आले आहे. ‘वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब’च्या अहवालानुसार, भारतातील ग्रामीण भागातील ४६ टक्के कुटुंबे भूमिहीन आहेत. दुसरीकडे, केवळ १० टक्के श्रीमंत कुटुंबांचा ग्रामीण भागातील ४४ टक्के जमिनीवर ताबा आहे. या अहवालासाठी ६५ कोटी लोकसंख्या आणि २.७० लाख गावांमधील डेटाचा अभ्यास करण्यात आला आहे.ग्रामीण भागातील जमिनीच्या विषमतेचा ‘गिनी इंडेक्स’ (विषमता मोजण्याचे प्रमाण) ७१ वर पोहोचला आहे. काही गावांत परिस्थिती इतकी गंभीर आहे की, एकाच जमीनदाराच्या ताब्यात गावाची ५०%पेक्षा अधिक जमीन आहे. सरासरी विचार करता, गावातील सर्वांत मोठ्या जमीनदाराकडे एकूण जमिनीच्या १२ टक्के हिस्सा असतो.

जमीन कोणाच्या ताब्यात?लोकसंख्या     जमीन मालकी

  • सर्वांत श्रीमंत १%     १८% 
  • सर्वांत श्रीमंत ५%     ३२% 
  • सर्वांत श्रीमंत १०%     ४४% 
  • ४६% कुटुंबे     ०% 

महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती आहे?

महाराष्ट्रात जमीनवाटपातील विषमता ठळकपणे दिसते. गिनी निर्देशांक ०.७०९ असून राज्यात जमीन समानपणे वितरित नाही. सुमारे ४८.१% कुटुंबे भूमिहीन असून, शेतीवर अवलंबून असूनही त्यांच्या ताब्यात जमीन नाही. वरच्या १०% कुटुंबांकडे ४०.८% जमीन आहे. केवळ १% श्रीमंतांकडे १४.७% जमीन केंद्रित आहे. एका मोठ्या जमीनधारकाचा सरासरी वाटा ८.८% आहे. काही गावांत मोठ्या जमीनदारांचे वर्चस्व दिसत असले तरी ते प्रमाण कमी (२.२%) आहे. बाजाराभिमुख शेती असूनही ही परिस्थिती आव्हानात्मक ठरत आहे.

नेमकी का वाढली ही दरी, प्रमुख कारणे काय आहेत?

  • ब्रिटिश राजवटीत थेट नियंत्रणाखाली असलेल्या गावांमध्ये जमीन विषमता अधिक आहे. याउलट, संस्थानिकांच्या राजवटीत असलेल्या भागात हे प्रमाण तुलनेने कमी आढळले.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील कुटुंबांमध्ये भूमिहीनतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. सामाजिक उतरंडीचा परिणाम जमिनीच्या मालकीवर आजही स्पष्ट दिसतो.
  • ज्या भागात जमिनी सुपीक आहेत किंवा शेतीसाठी पोषक वातावरण आहे, तिथे मोठ्या जमीनदारांकडे अधिक जमीन आहे. धक्कादायक म्हणजे, रस्ते किंवा बाजारपेठेच्या जवळ असूनही ही विषमता कमी झालेली नाही.
English
हिंदी सारांश
Web Title : Wealth disparity: 10% own 44% land, 46% rural landless.

Web Summary : India faces land ownership inequality. 46% of rural families are landless, while 10% of wealthy families control 44% of rural land. Maharashtra's disparity is also significant with high landlessness.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र