शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तरुणाची फसवणूक; पाठवायचे होते अमेरिकेत पण सोडले सर्बियाच्या जंगलात, नेमकं काय घडलं..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 12:24 IST

हरयाणातील एका तरुणाची 43 लाख रुपयांची फसवणूक झाली असून, गेल्या एका महिन्यापासून तो बेपत्ता आहे.

चंदीगड : भारतीय तरुणांना नेहमीच परदेशाची ओढ राहिली आहे. नोकरी करुन पैसे कमवण्यासाठी भारतीय विदेशात जातात. पण, विदेशात जाण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला तर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अशाच प्रकारची एक घटना हरयाणातील एका तरुणासोबत घडली आहे.

विदेशात पाठवण्यासाठी हरयाणातील युवक जश्नप्रीत (१९) याच्याकडून ४३ लाख रुपये घेतले, पण त्याला अमेरिकेऐवजी सर्बियाच्या घणदाट जंगलांत सोडून देण्यात आले. गेल्या एक महिन्यापासून त्याचा काहीच पत्ता नाही. जश्नप्रीतच्या कुटुंबीयांनी करनालच्या पोलीस अधीक्षकांकडे याबाबत लेखी तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले की, “अमेरिकेत पाठवण्यासाठी ४५ लाख रुपये मागण्यात आले होते. ४३ लाख रुपयांत पाठवण्याचे ठरले. पैसे उभे करण्यासाठी आम्हाला दोन एकर जमीन विकावी लागली.”

करनाल जिल्ह्यातील निसिंग पोलीस ठाण्यात एजंट बलबीर सिंग याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांची पोलीस चौकशी करीत आहेत. पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. जश्नप्रीत त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक आहे. दोन एकर जमीन विकल्यानंतर आता या कुटुंबाकडे उदरनिर्वाहासाठी एकच एकर जमीन राहिली आहे.३१ मार्चला झाले शेवटचे बोलणे

जश्नप्रीतची आई राजविंदर कौर यांनी सांगितले की, “३१ मार्च रोजी माझे जश्नप्रीतशी शेवटचे बोलणे झाले होते. एजंटने आम्हाला खात्री दिली की, जश्नप्रीतला कायदेशीर मार्गांनी अमेरिकेतून आणले जाईल. आधी त्याला दुबईला नेण्यात आले. मग सर्बियातून जंगलातील रस्त्याने नेण्यात येत असताना जश्नप्रीतने आक्षेप घेतल्यावर त्याला मारहाण करून तेथेच जंगलात सोडून दिले गेले.”

टॅग्स :HaryanaहरयाणाAmericaअमेरिकाPoliceपोलिस