शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान निधीचे ४२ लाख अपात्र लाभार्थी; महाराष्ट्रात ४.४५ लाख अपात्र लोकांकडून ३५८ कोटी रुपयांची वसुली होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 08:56 IST

योजनेत महाराष्ट्रातील १.१४ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

नितीन अग्रवाल

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान सन्मान निधीचा लाभ देशात ४२.१६ लाख अपात्र शेतकऱ्यांनी घेतला असून, त्यांच्याकडून सरकार २९,९२७ कोटी रुपये वसूल करणार आहे. महाराष्ट्रात असे ४,४५,४९७ जण अपात्र असून, ते सरकारचे ३५८ कोटी रुपये देणे लागतात. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अनुदान योजनेचा लाभ एकूण ४२,१६,६४३ अपात्रांनाही दिला गेला. त्यांच्याकडून २९,९२७ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली जाणार आहे. यात सर्वात जास्त शेतकरी आसाम (८.३५ लाख), तामिळनाडू (७.२२ लाख), पंजाब (५.६२ लाख) आणि महाराष्ट्रातील (४.४५ लाख) आहेत. 

सुजय पाटील, हिना गावित, श्रीकांत शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर काही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना तोमर यांनी ही माहिती दिली. योजनेत महाराष्ट्रातील १.१४ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यात १.१० कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले गेले.  लाभार्थी शेतकऱ्यांना सरासरी सहापेक्षा जास्त हप्त्यांत सरासरी १२,५४५ रुपये मिळाले. नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची नावे राज्य सरकारे करतात.

कोणत्या जिल्ह्यातून किती शेतकरी?

अहमनगर (६.८६ लाख), सोलापूर (६.२० लाख), कोल्हापूर (५.४७ लाख), सातारा (५.२९ लाख ) आणि पुण्यातील (५.१४ लाख) सर्वाधिक शेतकरी योजनेचे लाभार्थी होते. ठाणे (१.१९ लाख), नंदूरबार (१.२८ लाख), पालघर (१.३१ लाख), रायगड (१.५२ लाख), गडचिरोली (१.५२ लाख) आणि सिंधुदुर्गच्या (१.५४ लाख) शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र