जम्मू : आंतरराष्ट्रीय सीमेनजीकच्या साम्बा जिल्ह्यातील चिलियारी येथे पाकिस्तानातून भारतात येणारा आणखी एक बोगदा सापडला आहे़ तो भारतीय सीमेच्या २३ मीटर आत आहे़ सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) यासंदर्भात पाकिस्तानकडे निषेध नोंदवला आहे़बीएसएफ अधिकार्यांनी शनिवारी सांगितले की, घनदाट व लांब झाडेझुडपे साफ करीत असताना हा ३ बाय ३ फुटाचा बोगदा आढळून आला़ यापूर्वी २८ जुलै २०१२ रोजी आढळून आलेल्या ४०० मीटर लांबीच्या बोगद्याला तो जोडलेला आहे़ यासंदर्भात पाकिस्तानी रेंजर्सकडे निषेध नोंदवण्यात आलेला आहे़आंतरराष्ट्रीय सीमेनजीक खणण्यात आलेल्या या बोगद्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे़ भारतात घुसखोरी व तस्करी करण्याच्या इराद्याने पाकिस्तानातून भारतीय सीमेत तो खोदण्यात आला आहे़ पाकिस्तानने मात्र आधीप्रमाणे याही वेळी याचा इन्कार केला आहे़पाकची मुजोरीपाकमधून भारतात खोदण्यात आलेल्या या बोगद्याचा छडा लावण्याचे प्रयत्न पाकिस्तानने वेळोवेळी हाणून पाडले आहेत़ एका बीएसएफ अधिकार्याने सांगितले की, जेव्हा केव्हा आम्ही बोगद्याच्या वरून पाकिस्तानच्या दिशेने खोदकाम सुरू करतो, तेव्हा सीमेपलीकडून खोदकाम करणार्यांवर गोळीबार केला जातो व आम्हाला रोखले जाते़ बीएसएफ महासंचालक या मुद्यावर पुढे काय कारवाई करायची ते ठरवतील, असेही हा अधिकारी म्हणाला़
आंतरराष्ट्रीय सीमेवर आढळला ४०० मीटर लांब बोगदा
By admin | Updated: May 4, 2014 14:49 IST