४०० कोटींच्या घरावर बुलडोझर चालवला, दिल्लीत मोठी कारवाई; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 09:42 AM2024-03-03T09:42:19+5:302024-03-03T09:44:07+5:30

दिल्ली विकास प्राधिकरणाने शनिवारी छतरपूर येथील एका बंगल्यावर मोठी कारवाई केली आहे.

400 crore house bulldozer driven, major action in Delhi; What exactly is the case? | ४०० कोटींच्या घरावर बुलडोझर चालवला, दिल्लीत मोठी कारवाई; नेमकं प्रकरण काय?

४०० कोटींच्या घरावर बुलडोझर चालवला, दिल्लीत मोठी कारवाई; नेमकं प्रकरण काय?

दिल्ली विकास प्राधिकरणाने शनिवारी छतरपूर येथील एका बंगल्यावर मोठी कारवाई केली आहे. दिवंगत उद्योगपती पाँटी चड्ढा यांचा हा फॉर्महाऊस आहे. सुमारे १० एकरात पसरलेल्या या फार्म हाऊसचा मोठा भाग सरकारी जमिनीवर बांधण्यात आला आहे. याची किंमत सुमारे ४०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

कारवाईदरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हे फार्महाऊस पाडण्याचे काम रविवारीही सुरू राहणार आहे. माजी मद्य व्यावसायिक पाँटी चढ्ढा उर्फ ​​गुरदीप सिंह यांचे फार्महाऊस दक्षिण दिल्लीतील छतरपूर येथे सुमारे १० एकरावर बांधले होते. त्याचा मोठा भाग सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शाह गांधीनगरमधून; भाजपच्या १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातून एकही नाही

त्यामुळे अतिक्रमण काढण्याच्या सूचना डीडीएच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या होत्या. डीडीएने शुक्रवारपासून हे फार्महाऊस पाडण्याचे काम सुरू केले आणि शनिवारीही ते सुरूच राहिले. या फार्महाऊसवरून आतापर्यंत पाच एकरातील अतिक्रमण हटविण्यात आले. शनिवारी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

शनिवारी अंधार पडल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली असली तरी रविवारी बेकायदा बांधकाम पाडून सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात येणार असल्याचे डीडीएने सांगितले. 

Web Title: 400 crore house bulldozer driven, major action in Delhi; What exactly is the case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :delhiदिल्ली