शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सलाम! हवाई दलाच्या निवृत्त कर्मचाऱ्यानं संरक्षण मंत्रालयाला दिली आयुष्यभराची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 14:52 IST

राजनाथ सिंह यांच्याकडे धनादेश सुपूर्द

नवी दिल्ली: एखादा सैनिक लष्करातून पडू शकतो. मात्र सैन्याच्या मनातून लष्कर कधीही बाहेर पडत नाही, असं म्हटलं होतं. याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. चाळीस वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेल्या सी. बी. आर. प्रसाद यांनी त्यांची आयुष्यभराची कमाई संरक्षण मंत्रालयाला देणगी स्वरुपात दिली आहे. 'मी भारतीय हवाई दलात ९ वर्षे सेवा दिली. भारतीय रेल्वेनं मला नोकरीची ऑफर दिल्यानं मी हवाई दलातून बाहेर पडलो. मात्र दुर्दैवानं मला ती नोकरी मिळाली नाही. त्यानंतर मी कुक्कुटपालनचा लहानसा व्यवसाय सुरू केला. सुदैवानं त्या व्यवसायानं मला आधार दिला,' असं प्रसाद यांनी सांगितलं. 'कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर हवाई दलाला काही तरी द्यायला हवं, असा विचार माझ्या मनात होता. कारण हवाई दलानं मला खूप काही दिलं आहे. त्यामुळेच मी संरक्षण दलाला १ कोटी ८ लाख रुपयांची देणगी दिली,' असं त्यांनी पुढे सांगितलं. प्रसाद यांनी सोमवारी (काल) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देणगीचा धनादेश राजनाथ यांना दिला. प्रसाद यांनी ३० वर्षे कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला. यासोबतच समाजाचं ऋण फेडण्यासाठी त्यांनी क्रीडा विद्यापीठाचीदेखील स्थापना केली. प्रसाद यांनी जवळपास ९ वर्षे भारतीय हवाई दलाच काम केलं. संरक्षण दलाला आयुष्यभराची कमाई देण्याचा निर्णय घेत असताना कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती, असा प्रश्न प्रसाद यांना विचारण्यात आला. त्यावर कुटुंब या निर्णयामागे अगदी ठामपणे उभं राहिल्याचं त्यांनी सांगितलं. 'मी माझ्या मुलीला माझ्या संपत्तीतील २ टक्के आणि पत्नीला १ टक्के वाटा दिला. त्यानंतर उर्वरित रक्कम संरक्षण दलाला दिली. सामाजिक जबाबदारी म्हणून मी हा निर्णय घेतला,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागindian air forceभारतीय हवाई दल