शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के भारतीयांना ‘हार्ट फेल्युअर’चा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 06:34 IST

हार्ट फेल्युअर या संज्ञेचा अर्थ हृदय बंद पडल्याची अवस्था असा होत नाही, तर हृदयाचे काम बंद पडण्याच्या बेतात आहे, अशी अवस्था असा या संज्ञेचा अर्थ आहे.

मुंबई : हार्ट फेल्युअर या संज्ञेचा अर्थ हृदय बंद पडल्याची अवस्था असा होत नाही, तर हृदयाचे काम बंद पडण्याच्या बेतात आहे, अशी अवस्था असा या संज्ञेचा अर्थ आहे. मेडिकल जर्नलच्या अभ्यासानुसार, ४० टक्के भारतीयांना हार्ट फेल्युअरचा धोका आहे.हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर हे दोन वेगळे कार्डिओव्हस्क्युलर विकार आहेत. भारतात ८-१० दशलक्ष लोकांना हार्ट फेल्युअरचा त्रास आहे. भारतात दरवर्षी सुमारे २० लाख जणांना हार्ट अटॅक येत आहे.हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश गौतम यांनी सांगितले की, हार्ट अटॅक ही अचानक होणारी कार्डिअ‍ॅक घटना आहे. धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने हा विकार निर्माण होतो. खाण्याच्या अनारोग्यकारक सवयी, उच्च रक्तदाब, वायुप्रदूषण, उच्च कोलेस्ट्रॉल आणि तंबाखूचे सेवन हे हृदयविषयक आजारांच्या प्रमाणामध्ये वाढ होण्यास प्रमुख कारणीभूत घटक ठरतात.हार्ट फेल्युअरचे व्यवस्थापनहार्ट अटॅक येऊन गेलेले रुग्ण डॉक्टरांनी सल्ल्याचे काटेकोर पालन करून हार्ट फेल्युअर टाळू शकतात, नियमित व्यायाम, आरोग्यपूर्ण आहार, धूम्रपान टाळणे, अशा बदलांच्या मदतीने,तसेच मधुमेह, हायपरटेन्शनसारख्या आजारांचे व्यवस्थापन करून हार्ट फेल्युअर टाळता येते.हार्ट अटॅकची लक्षणेहार्ट फेल्युअरच्या लक्षणांमध्ये श्वास लागणे किंवा हृदयाची गती वाढणे. घोटे, पाय व ओटीपोटावर सूज येणे, उंच उशी घेतल्याशिवाय झोपणे कठीण होणे, सतत थकल्यासारखे वाटणे आदींचा समावेश होतो, तर पाठ, मान, हात किंवा जबडा दुखणे, मळमळ होणे, घाम फुटणे ही हार्ट अटॅकची लक्षणे आहेत.हार्ट फेल्युअरचे निदानहार्ट फेल्युअरच्या सुमारे ६० टक्के रुग्णांमध्ये निदानच होत नाही किंवा चुकीचे निदान होते. पम्पिंग कार्यक्षमता व प्रसरण पावलेले हृदय यांच्याबद्दल निदान करण्यात ईसीजीची मदत होऊ शकते. एनटी-प्रोबीपी चाचणी प्रामुख्याने हार्ट फेल्युअरची तीव्रता निश्चित करण्यासाठी, तिचे निदान करण्यासाठी व मूल्यमापन करण्यासाठी वापरली जाते.जीवनशैलीत बदलासह योग्य आहार घेणे गरजेचेहार्ट फेल्युअर ही वाढत जाणारी अवस्था आहे. पम्पिंगची जबाबदारी असलेले हृदयाचे स्नायू कमकुवत किंवा ताठर झाल्यामुळे पम्पिंगची कृती अनियमित होते व त्यातून हार्ट फेल्युअर हा विकार होतो. इस्केमिक हृदयविकारांच्या प्रमाणात, तसेच मधुमेह व हायपर टेन्शनसारख्या चिवट अवस्थांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने, हार्ट फेल्युअरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. श्वास लागणे, थकवा, घोटे-पाय-पोटाला आलेली सूज, कारण नसताना वजन वाढणे, तसेच रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जावे लागणे, यासारख्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे. यातील कोणतीही समस्या जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला तातडीने घेतला पाहिजे. हे प्रकार वयोमानाने होत असावेत, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे किंवा ही लक्षणे अन्य आजाराशी जोडणे धोक्याचे आहे. त्याचप्रमाणे, आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे, शिवाय योग्य आहाराचे सेवन केले पाहिजे.- डॉ. देव पहलजानी, हृदयरोगतज्ज्ञ.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगIndiaभारतHealthआरोग्य