शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे ४० नेते स्टार प्रचारक; पंतप्रधान माेदींसह नेत्यांची यादी आयाेगाकडे सुपुर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 05:36 IST

उद्याच्या बैठकीत पाच राज्यांतील उमेदवारांची नावे निश्चित केली जातील व त्याची घोषणा रणनीतिक रूपाने केली जाणार आहे. 

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ व मिझोराम या पाच राज्यांतील उर्वरित उमेदवारांच्या नावावर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर भाजप आक्रमक निवडणूक प्रचार सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० नेत्यांना स्टार प्रचारक करण्यात आले आहे. 

उद्याच्या बैठकीत पाच राज्यांतील उमेदवारांची नावे निश्चित केली जातील व त्याची घोषणा रणनीतिक रूपाने केली जाणार आहे. भाजपने आजवर राजस्थानमधील २०० पैकी ४१, मध्य प्रदेशच्या २३० पैकी १७७, मिझोरामच्या ४० पैकी १२, छत्तीसगढच्या ९० पैकी ८५ उमेदवारांची घोषणा केली आहे; परंतु तेलंगणाच्या उमेदवारांची आतापर्यंत घोषणा करण्यात आलेली नाही. 

उद्या होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या सर्व पाच राज्यांतील उर्वरित उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात येईल. नावांची घोषणाही लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. छत्तीसगढमध्ये नामांकन सुरू झाले असून, मध्य प्रदेशात २१ ऑक्टोबरपासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार आहे. 

गडकरी, फडणवीस आणि याेगींचाही समावेशभाजपने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी आज निवडणूक आयोगाकडे सुपुर्द केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० नावांचा समावेश आहे. ४० नेत्यांबरोबर भाजप आपला पाच राज्यांतील आक्रमक प्रचार सुरू करणार आहे. यात एकाच दिवसात या सर्व ४० नेत्यांच्या ४० ठिकाणी निवडणूक सभा घेण्याची योजना आहे. याला कार्पेट बॉम्बिंग असेही म्हटले जात आहे.

तेलंगणा व राजस्थानच्या उमेदवारांबाबत चर्चाभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी तेलंगणा व राजस्थानच्या भाजप नेत्यांची कोर कमिटीची बैठक झाली. एक, दोन किंवा तीन नावांचे पॅनल पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला पाठवले जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा