शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

झाडावर वीज पडली अन् चार माणसं जणू पुठ्ठ्याप्रमाणे कोसळली; अंगावर काटा आणणारा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 20:31 IST

सोसायटीत असलेल्या सीसीटीव्हीत अंगावर काटा आणणारी घटना कैद; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

नवी दिल्ली: जोरदार पाऊस कोसळत असल्यास अनेक जण आसरा शोधतात. मात्र आकाशात विजा चमकत असताना निर्माणाधीन इमारतीचा, झाडांचा आडोसा घेणं धोकादायक ठरू शकतं. हरयाणातल्या गुरुग्राममध्ये याचा प्रत्यत देणारी एक घटना घडली आहे. झाडावर वीज कोसळल्यानं झाडाखाली आश्रयाला उभे असलेले चार जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.दिल्ली, एनसीआरसह उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये सध्या पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. गुरुग्रामच्या सेक्टर ८२ मधील वाटिका सिटीत वीज कोसळल्यानं झाडाखाली उभ्या असलेल्या चौघांना दुखापत झाली आहे. अंगावर अक्षरश: काटा आणणारी ही घटना संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास घडली.  पावसाचा जोर वाढल्यानं बगिच्यात काम करणाऱ्या चार व्यक्तींनी झाडाखाली आसरा घेतला. तितक्यात आकाशातून वीज कोसळली. झाडावर वीज पडताच झाडाखाली उभे असलेले चारही जण जमिनीवर कोसळले. जखमी झालेल्या व्यक्तींवर सध्या मानेसरमधल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्यक्ती कोण आहेत, त्यांची नावं काय, याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही. मात्र अंगावर शहारे आणणारी ही घटना सोसायटीत असलेल्या एका फ्लॅटबाहेरील कॅमेऱ्यात कैद झाली आहे.आज सकाळपासूनच दिल्लीतल्या अनेक भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्येही पाऊस सुरू आहे. डोंगराळ भाग असलेल्या राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. त्यामुळे उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पुढील एक ते दोन दिवस वरुणराजाचा मुक्काम असण्याची शक्यता आहे.