शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 09:53 IST

कारवाईत एका अधिकाऱ्यासह तीन जवान जखमी

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चार चकमकी झाल्या आहेत. यातील एक चकमक शोपिया जिल्ह्यातल्या इमाम भागात अजूनही सुरू आहे. या ठिकाणी एका घरात दोन-तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. तर बांदिपोरातल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अली भाईचा समावेश आहे. तो मूळचा पाकिस्तानचा रहिवासी होता. बारामुल्ला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तर शोपिया जिल्ह्यात एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या चार चकमकींमध्ये आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलं आहे. या कारवाईत एका अधिकाऱ्यासह तीन जवान जखमी झाले. बारामुल्लातील कलंतरा भागात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिली. अद्याप चकमक सुरू असून यात एक अधिकारी आणि दोन जवान जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. चकमकीत जखमी झालेल्या जवानांवर बादामीबागमधील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं आसपासचा परिसर ताब्यात घेत सर्च ऑपरेशन सुरू केलं. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये काही वेळ चकमक सुरू होती. काल बारामुल्लामध्ये सर्च ऑपरेशन सुरू असताना दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. यानंतर काही वेळातच सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तळाला लक्ष्य केलं. सुदैवानं या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. यानंतर या भागातील सुरक्षा वाढवण्यात आली. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर