शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण रस्ते अपघातानं भोजपुरी सिनेइंडस्ट्रीत शोककळा; ४ नवोदित कलाकारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 09:43 IST

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

बिहारमधील कैमूर येथे सोमवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांमध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टीतील चार उगवत्या कलाकारांनाही आपला जीव गमवावा लागला. बिहारच्या कैमूर जिल्ह्यात ट्रक, एसयूव्ही आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत मृत्यू झालेल्या ९ लोकांमध्ये भोजपुरी गायक छोटू पांडे यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. याशिवाय भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारी आणि सिमरन श्रीवास्तव यांनाही या रस्ता अपघातात जीव गमवावा लागला आहे.

मोहनिया पोलीस स्टेशन हद्दीतील देवकाली गावाजवळ जीटी रोडवर रविवारी सायंकाळी ही घटना घडली. मोहनियाचे डीएसपी दिलीप कुमार यांनी सांगितले की, सोमवारी मृतांची ओळख पटली असून भोजपुरी गायक विमलेश पांडे उर्फ ​​छोटू पांडे यांचाही त्यात समावेश आहे.आंचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव, प्रकाश राम, दधिबल सिंग, अनु पांडे, शशी पांडे, सत्यप्रकाश मिश्रा आणि बागीश पांडे अशी इतर मृतांची नावे आहेत. दोन महिलांसह आठ जणांना घेऊन जाणाऱ्या वाहनाने आधी मोटारसायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

यानंतर, एसयूपी आणि दुचाकी दोघेही दुसऱ्या लेनमध्ये गेले, तेथे एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. तेथे मोटारसायकल चालकासह सर्व नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  

टॅग्स :Accidentअपघात