शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'ते' 39 भारतीय अवैधरित्या इराकला गेले होते- व्ही. के. सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 08:54 IST

39 भारतीय नागरिक ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून अवैधरित्या इराकमध्ये गेले होते, अशी माहिती व्ही. के. सिंग यांनी दिली.

आयसिस या दहशतवादी संघटनेकडून इराकमध्ये मारले गेलेले 39 भारतीय हे भारतातून अवैधरित्या आखाती देशात गेले होते. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी ही माहिती दिली आहे. इराकमधील मोसूल भागात 2014 मध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी 39 भारतीयांची हत्या केली होती. त्यांच्या मृतदेहांचे अवशेष काल (सोमवारी) भारतात आणण्यात आले. याबद्दल बोलताना हे सर्व भारतीय नागरिक ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून अवैधरित्या इराकमध्ये गेले होते, अशी माहिती व्ही. के. सिंग यांनी दिली. या नागरिकांची कोणतीही नोंद मध्य पूर्वेतील दूतावासाकडे नव्हती, असेही त्यांनी सांगितले.इराकमध्ये मारल्या गेलेल्या 39 भारतीयांच्या मृतदेहांचे अवशेष आणण्यासाठी व्ही. के. सिंग इराकला गेले होते. या मृतदेहांचे अवशेष हवाई मार्गे भारतात आणण्यात आले. मारल्या गेलेल्या 39 पैकी एकाचे डीएनए  न जुळल्याने 38 जणांच्या मृतदेहांचे अवशेष भारतात आणले गेले. यापैकी 27 जण पंजाबचे, तर चार जण हिमाचल प्रदेशचे रहिवासी आहेत. उर्वरित सात जण हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे आहेत. इराकमध्ये मारल्या गेलेल्या 27 जणांच्या कुटुंबांना पंजाब सरकारने प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीही दिली जाणार आहे. ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून होणारा बेकायदेशीर प्रवास रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सिंह म्हणाले. मृतदेहांचे अवशेष भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारला इतका वेळ का लागला, असा प्रश्न सिंग यांना विचारण्यात आला. याबद्दल बोलताना, अजूनही इराकमधील युद्ध पूर्णपणे संपलेले नाही, असे उत्तर त्यांनी दिले.  'इराकमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धादरम्यान त्यांच्या सैन्याला मृतदेहांचे अवशेष गाडलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांचे केस मोठे होते. त्यावरुन ते पंजाबी असल्याची शक्यता निर्माण झाली. यावरुन पुढील तपास करण्यात आला आणि मृतदेहांच्या अवशेषांची ओळख पटली,' असे सिंग यांनी सांगितले.  

टॅग्स :VK Singhव्ही के सिंग