शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

  ३९ भारतीयांचे मृतदेह आज आणणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 01:16 IST

युद्धग्रस्त इराकमध्ये ठार मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे रविवारी इराकला रवाना झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी मृतदेह दाखल होण्याची अपेक्षा आहे.

नवी दिल्ली  - युद्धग्रस्त इराकमध्ये ठार मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे रविवारी इराकला रवाना झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी मृतदेह दाखल होण्याची अपेक्षा आहे.सिंह दुपारी १ वाजता हिंदोन विमानतळावरून रवाना झाले. परत येताच सिंह आधी अमृतसरला व त्यानंतर पाटणा व कोलकाताला जाऊन मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देतील. काही मृतांच्या नातेवाइकांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती.जून २०१४ मध्ये इसिस या दहशतवादी गटाने इराकच्या मोसूल गावातून ४० भारतीयांचे अपहरण केले होते. एकाने मी बांगलादेशचा मुस्लीम असल्याचे सांगून स्वत:ची सुटका करून घेतली होती. ही माहिती स्वराज यांनी संसदेत गेल्या मार्चमध्ये सांगितली होती. या भारतीयांचे मृतदेह मोसूलच्या वायव्येकडील बदूश गावात ताब्यात घेण्यात आले, असे स्वराज्य म्हणाल्या होत्या. ठार मारण्यात आलेल्या ३९ जणांमध्ये पंजाबचे २७, हिमाचल प्रदेशचे चार, पश्चिम बंगालचे दोन व उर्वरित बिहारचे आहेत.

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या