शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवलं अन् पाकमध्ये शेअर बाजार गडगडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 16:00 IST

Article 370 Impact: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 संपुष्टात आणलं आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 जवळपास संपुष्टात आणलं आहे. त्यानंतर पाकिस्तानमध्येशेअर बाजार गडगडला आहे. पाकिस्तानचाशेअर बाजारचा बेंचमार्क इंडेक्स KSE100 हा 600 अंकांनी कोसळला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची शिफारस केली आहे. तसेच जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचं विधेयकही मांडलं होतं. ज्यात लडाखला जम्मू-काश्मीरमधून वेगळं करून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.पाकिस्तानचा शेअर बाजारात उघडल्यावरच कोसळला. केएसई100 चा 31666.41 अंकांवर उघडला. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी कलम 370 हटवण्याची शिफारस केली आणि राष्ट्रपतींनी लागलीच त्याला मंजुरी दिली. त्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात एकच खळबळ माजली. त्यानंतर काश्मीरचा शेअर बाजार 687.45 अंकांनी कोसळून 30,978.96 स्तरावर खाली आला. जो दिवसभरातील नीचांक होता.ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा शेअर बाजार गेल्या दोन वर्षांत जगातील सर्वात खराब कामगिरी करणारा शेअर बाजार म्हणून समोर आला आहे. गुंतवणूकदारांचे जवळपास 6,88,000 कोटी रुपये पाकिस्तान शेअर बाजारात बुडाले आहेत. पंतप्रधान इम्रान खान सत्तेवर आल्यानंतर जवळपास वर्षभरातच जनतेच्या रागाचा पाकिस्तानला सामना करावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये आर्थिक संकटही वाढत आहे. पाकिस्तानमध्ये गरजेच्या वस्तूंचे दरही वेगानं गगनाला भिडत आहेत. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानचा रुपया 30 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 35 Aकलम 35-एArticle 370कलम 370Pakistanपाकिस्तानStock Marketशेअर बाजार