शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण...
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
4
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
5
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
6
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
7
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
8
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
9
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
10
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
11
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
12
"मी पंकज कपूर यांचा मुलगा आहे, पण इंडस्ट्रीत एकटा लढलो", शाहिद कपूर स्पष्टच बोलला
13
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
14
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
15
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
16
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
17
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
18
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
19
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
20
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

JKLF चा वॉन्टेड शफात शांगलू ३५ वर्षांनी सापडला; एका अपहरणाने पाच दहशतवादी सुटले अन् काश्मीर पेटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:29 IST

मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबैया सईद अपहरण प्रकरणात ३५ वर्षांनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Mehbooba Mufti Sister Kidnapping Case: देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या आणि दहशतवादाच्या पर्वाला सुरुवात करणाऱ्या १९८९ मधील तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबैया सईद अपहरण प्रकरणात ३५ वर्षांनंतर एक महत्त्वाचा आरोपी सीबीआयच्या हाती लागला आहे. या प्रकरणातील फरार आरोपी शफात अहमद शांगलू याला सोमवारी सीबीआयने श्रीनगरमधून अटक केली. रणबीर दंड संहिता आणि टाडा कायद्या अंतर्गत यासीन मलिक आणि इतर आरोपींसोबत शांगलू या कटात सामील होता. जेकेएलएफ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख यासीन मलिकचा तो जवळचा सहकारी मानला जातो. शांगलूवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

५०० मीटरवर अपहरण, ५ दिवसांनी सुटका

 जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची बहीण रुबैया सईद यांचे अपहरण ८ डिसेंबर १९८९ रोजी त्यांच्या घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावरुन करण्यात आले होते. रुबैया सईद श्रीनगरच्या लाल देद हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या. त्यादिवशी संध्याकाळी त्या सुरक्षा नसलेल्या मिनी बसने घरी परतत असताना नौगाम येथे चार लोकांनी त्यांना बंदुकीच्या धाकावर मारुती कारमध्ये बसवून पळवून नेले. नंतर ही घटना जेकेएलएफने केल्याचे समोर आले. या अपहरणकांडाचा मास्टरमाईंड जेकेएलएफचा नेता अशफाक माजिद वानी होता.

पाच दहशतवाद्यांना सोडले

जेकेएलएफने रुबैया यांच्या सुटकेसाठी तुरुंगात असलेल्या त्यांच्या सात साथीदारांच्या सुटकेची अट ठेवली होती. पाच दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर तत्कालीन व्ही. पी. सिंह सरकारने दहशतवाद्यांसमोर नमते घेतले आणि त्यांच्या मागणीनुसार पाच दहशतवाद्यांना सोडले. यामध्ये शेख मोहम्मद, शेर खान, नूर मोहम्मद कलवाल, जावेद जरगर आणि अल्ताफ बट यांचा समावेश होता. त्यानंतर रुबैया यांची १३ डिसेंबरच्या संध्याकाळी सुटका झाली.

वडिलांनीच केला सुटकेला विरोध?

रुबैया सईद सध्या तामिळनाडूमध्ये राहत असून, तपास यंत्रणेने त्यांना या अपहरण प्रकरणामध्ये सरकारी साक्षीदार बनवले आहे. सीबीआयने १९९० मध्ये या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. रुबैया यांनी या गुन्ह्यात यासीन मलिकसह इतर चार आरोपींची ओळख पटवली होती. या अपहरण प्रकरणामुळे दिल्लीसह संपूर्ण देशात खळबळ माजली होती. जुलै २०१२ मध्ये, माजी एनएसजी मेजर जनरल ओपी कौशिक यांनी रुबैया सईद अपहरण प्रकरणात एक खळबळजनक दावा केला होता. अपहरणानंतर रुबैया कोठे ठेवले आहे, याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, पण तत्कालीन गृहमंत्र्यांनी त्वरित कारवाईस नकार दिल्याने पाच दहशतवाद्यांना सोडावे लागले.

अपहरणाचे नाटक कटाचा भाग

दुसरीकडे, ग्रेट डिस्क्लोजर: सिक्रेट्स अनमास्क्ड या पुस्तकात फुटीरतावादी नेता हिलाल वॉरने खुलासा केला  की काश्मीरला अस्थिर करण्याची पटकथा खूप आधी लिहिली गेली होती. प्रत्यक्ष काम १३ डिसेंबर १९८९ रोजी सुरू झाले. १९९० च्या दशकातील काही तुरळक घटना वगळता, काश्मीरमधील परिस्थिती ठीक होती. हिलाल वॉरच्या मते, दहशतवादाला चालना देणारे रुबाईया सईद अपहरण प्रकरण हे केवळ नाटक होते. आयसी ८१४ चे अपहरण, संसदेवर हल्ला आणि खोऱ्यातील इतर मोठ्या दहशतवादी घटना या अपहरणानंतर सुरू झाल्या. दहशतवाद्यांच्या सुटकेपूर्वी, भारत सरकारने अशी अट घातली होती की त्यांच्या सुटकेनंतर कोणत्याही जल्लोष  मिरवणुका काढल्या जाणार नाहीत. पण त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले तेव्हा लोक रस्त्यावर उतरले.

दहशतवाद्यांच्या सुटकेनंतर काश्मीर खोऱ्यात मोठा जल्लोष झाला आणि तेव्हापासूनच खोऱ्यात अपहरण आणि हत्येचे सत्र सुरू झाले. या घटनेनंतरच काश्मीरमधील परिस्थिती अधिक बिघडल्याचे मानले जाते. या प्रकरणात यासीन मलिक आणि नऊ इतर आरोपींवर आधीच आरोप निश्चित करण्यात आले असून, मलिक सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : JKLF operative arrested after 35 years in Rubaiya Sayeed kidnapping case.

Web Summary : Shafat Shangloo, wanted in the 1989 Rubaiya Sayeed kidnapping, was arrested after 35 years. The kidnapping led to the release of five terrorists and ignited unrest in Kashmir. The case involves Yasin Malik and others; Shangloo had a 10-lakh reward.
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCrime Newsगुन्हेगारीMehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती