शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कायमच्या निवासी तरच नोकरीत ३५% आरक्षण; बिहारमध्ये सरकारी नोकरीसाठी महिलांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 08:08 IST

राज्य सरकारने २०१६ मध्ये सर्व पातळीवर सरकारी नोकऱ्यांत महिलांसाठी ३५ टक्के आरक्षण लागू केले होते. मात्र, यात कोणत्याही राज्याची महिला याचा लाभ घेऊ शकत होती.

पाटणा : बिहारमध्ये राज्य सरकारी नोकऱ्यांत महिलांसाठी असलेल्या ३५ टक्के आरक्षणाचा लाभ आता राज्यात कायमस्वरूपी निवासी असलेल्या महिलांनाच दिला जाईल. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी हा निर्णय घेतला. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारी नोकऱ्यांत स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी काही दिवसांपासून होत होती. गेल्या आठवड्यात यासाठी नोकरीसाठी इच्छुक तरुण-तरुणींनी मोर्चाही काढला होता. या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने २०१६ मध्ये सर्व पातळीवर सरकारी नोकऱ्यांत महिलांसाठी ३५ टक्के आरक्षण लागू केले होते. मात्र, यात कोणत्याही राज्याची महिला याचा लाभ घेऊ शकत होती. यादरम्यान, अशा नोकऱ्यांत सर्वच पातळीवर राज्यातील कायमस्वरूपी वास्तव्याचे धोरण लागू करण्याची मागणी जोर धरत होती. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बहुमत मिळाले तर ‘राजद’पक्ष महिलांना सरकारी नोकऱ्यांत हे धोरण लागू करेल, असे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला.

मृत पालकांचे प्रमाणपत्र कुठून आणायचे : अब्दुल्ला बिहारमधील मतदारयाद्यांचे विशेष  पुनरवलोकन घटनाबाह्य असल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुन अब्दुल्ला यांनी केला आहे. बिहारमधील दीड कोटीपेक्षा अधिक नागरिक राज्याबाहेर आहेत. ते नोंदणीसाठी कसा अर्ज करणार, ते मतदान कसे करणार, ते आपल्या मृत पालकांचे प्रमाणपत्र कुठून आणणार, असे प्रश्न उपस्थित करत अब्दुल्लांनी आयोगाच्या भूमिकेवर शंका घेतली.

बिहारमध्ये आज विरोधकांचे ‘चक्का जाम’ आज बुधवारी काँग्रेस नेते व लोकसभेतील  विरोधी पक्षनेते राहुल गांधी पाटणा दौऱ्यावर असून राज्यातील रोजगार धोरण व मतदारयाद्या पुनरावलोकनाविरुद्ध पुकारलेल्या ‘चक्का जाम’ आंदोलनात ते सहभागी होतील. ‘इंडिया’ आघाडीचे नेते तेजस्वी यादव यांनी ही घोषणा केली. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार