शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

...तर 35 ते 40 रूपयांत मिळेल पेट्रोल, पण मोदी सरकार घेणार का हा मोठा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 13:16 IST

गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे मोदी सरकारवर टीका होत आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींवर अंकुश ठेवण्यासाठी त्याचा जीएसटीमध्ये समावेश करावा असं सांगून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चेंडू अर्थ मंत्री अरूण जेटलींकडे टोलावला आहे.

नवी दिल्ली, दि. 15 - गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे मोदी सरकारवर टीका होत आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किंमतींवर अंकुश ठेवण्यासाठी त्याचा जीएसटीमध्ये समावेश करावा, असं सांगून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चेंडू अर्थ मंत्री अरूण जेटलींकडे टोलावला आहे. केंद्र सरकारने 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू केला पण पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला नाही.

गेल्या एका महिन्यातच पेट्रोलच्या किंमत सात रूपयांनी वाढल्या आहेत. गुरुवारी (14 सप्टेंबर ) रोजी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 70.39 रुपये प्रतिलीटर, कोलकातामध्ये 73.13 रुपये प्रतिलीटर, मुंबईत 79.5 रुपये प्रतिलीटर आणि चेन्नईमध्ये 72.97 प्रतिलीटर इतकी होती. ऑगस्ट 2014 पासूनच्या पेट्रोलच्या या सर्वाधिक किंमती आहेत.  

ऑगस्ट 2014 मध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 70 रुपयांपेक्षा जास्त होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 103.86 डॉलर (जवळपास 6300 रुपये) प्रति बॅरेल होती. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून आहेत. गुरूवारची आंतरराष्ट्रीय बाजारातली कच्च्या तेलाची किंमत  54.16 डॉलर (3470 रुपये) प्रति बॅरेल होती. त्यामुळे सध्याच्या दरानुसार भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना एक लीटर पेट्रोल अवघ्या 21 रूपयांना मिळतं. त्यावर प्रक्रिया करून वापरण्याजोगं बनवण्यात त्याला 10 रूपये खर्च होतो. म्हणजे सरकारने कोणता टॅक्स आकारला नाही, तर 31 रूपयांमध्ये पेट्रोल मिळू शकतं.  पण सध्याच्या करव्यवस्थेत केंद्र सरकारशिवाय राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलवर व्हॅट आकारला जातो. राजधानी दिल्लीत 27 टक्के व्हॅट तर मुंबईत 47.64 टक्के व्हॅट लागतो. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळते. 

जर पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला तर त्यावर 28 टक्के कर आकारला जाईल. जर सरकारने 12 टक्के जीएसटी आकारला तर सामान्य व्यक्तीला 38 रूपये, 18 टक्के जीएसटी आकारला तर 40 रूपये आणि 28 टक्के जीएसटी आकारला तर 43.44 रूपये प्रतिलीटर सामान्य माणसाला मोजावे लागतील. जर केंद्र सरकारने जीएसटी व्यतिरिक्त अतिरिक्त कर (सेस) आकारण्याचं ठरवलं तरी किंमतीत दोन-चार रूपयांची वाढ होऊ शकते. पण तरीही सध्यापेक्षा सामान्य व्यक्तीला 20 रूपये कमी मोजावे लागतील. पण मोदी सरकार हा महत्त्वाचा निर्णय घेणार का हा प्रश्न आहे, पण शक्यता नाकारता येत नाही. 

कारण, धर्मेंद्र प्रधान यांच्या मागणीनुसार उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत राज्य सरकारांनी पेट्रोलियम पदार्थांवरील व्हॅट कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. आता त्यांच्याकडून येणारे अंतिम अहवाल पाहून, पेट्रोलियम पदार्थांवर देशभरात किती कर आकारायचा याबाबत जीएसटी काऊंन्सिल निर्णय घेणार आहे.  

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप