शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शबरीमालात महिलांचा प्रवेश रोखणारे ३,३४६ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 06:43 IST

मानवाधिकार कार्यकर्ते राहुल ईश्वर यांना अटक

थिरुवनंतपुरम : शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात सर्व वयाच्या महिलांचा प्रवेश सर्वोच्च न्यायालयाने खुला करूनही निदर्शने करून १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखणाऱ्यांविरुद्ध केरळ सरकारने सुरू केलेल्या अटकसत्रात अटक केलेल्यांची संख्या रविवारी ३,३४५ वर पोहोचली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत यासंदर्भात एकूण ५१७ गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत.शबरीमाला मंदिराच्या पुजारी कुटुंबातील सदस्य व मानवाधिकार कार्यकर्ते राहुल ईश्वर यांना रविवारी सकाळी कोचीमध्ये झालेली अटक ही या अटकसत्रातील ताजी अटक होती. मंदिर प्रवेशाच्या वादासंदर्भात गेल्या आठवड्यात कथित प्रक्षोभक विधाने केल्यावरून ईश्वर यांना अटक करण्यात आली.शनिवार दुपारपासून आयप्पा मंदिर असलेल्या पथनामथिट्टा, थिरुवनंतपुरम व एर्नाकुलम या जिल्ह्यांमध्ये ५०० हून अधिक व्यक्तींना अटक केली गेली. त्यापैकी फक्त १२२ जणांचा पोलिसांनी रिमांड घेतला. बाकीच्यांना जामिनावर सोडण्यात आले. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी या अटकसत्राचा तीव्र शब्दांत निषेध करून केरळच्या डाव्या आघाडीच्या सरकारने हिंदूंच्या श्रद्धेची पायमल्ली करून विस्तवाशी खेळू नये, असा इशारा दिला होता. 

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिरKeralaकेरळ