शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

३३ टक्के एमएसएमई बंद पडण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 04:36 IST

आॅल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमो) आणि अन्य नऊ औद्योगिक संघटना यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणामधून वरील धक्कादायक निष्कर्ष उघड झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊननंतर उद्योगधंदे आणि व्यापार पुन्हा सुरू होत असला तरी आपली मर्यादित साधनसामग्री आणि भविष्याबाबतची अनिश्चितता यामुळे देशातील एकतृतीयांश म्हणजेच ३३ टक्के एमएसएमई हे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेक्षणामधून निघाले आहेत.

आॅल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमो) आणि अन्य नऊ औद्योगिक संघटना यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणामधून वरील धक्कादायक निष्कर्ष उघड झाले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात आॅनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये ४६,५२५ एमएसएमई आणि व्यावसायिक तसेच कंपन्यांचे सीईओ व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला आहे.

या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यापैकी एमएसएमईमधील ३५ टक्के तर व्यावसायिकांपैकी ३७ टक्के मते ही लॉकडाउनच्या काळामध्ये झालेले नुकसान हे भरून येण्यासारखे नसून त्यामुळे उद्योगांना आपले व्यवसाय गुंडाळण्याखेरीज अन्य काही पर्याय नसल्याचे मत व्यक्त करणारे आहेत. ३२ टक्के एमएसएमर्इंच्या मते हे नुकसान भरून निघण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अवघ्या १२ टक्के प्रतिसादकांनी केवळ तीन महिन्यांमध्ये हे नुकसान भरून निघण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे.या उद्योगांवर कर्जाचा मोठा बोजा आहे. त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीपासूनच या उद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.

या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी एमएसएमईमधील ३ टक्के, कंपन्यांमधील ६ टक्के आणि ११ टक्के व्यावसायिकांनी कोरोनाच्या संकटाचा आपल्यावर कोणताच परिणाम होणार नसल्याचे सांगितले आहे. ३२ टक्के सहभागींनी आपला उद्योग या समस्येमधून बाहेर पडण्याची शक्यता नसल्याचे मत व्यक्त केले आहे. २९ टक्के सहभागितांनी या संकटामधून बाहेर पडण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.केवळ कोरोनाच कारणीभूत नाहीच्लॉकडाऊनच्या काळामधील झालेले नुकसान, मर्यादित असलेली साधनसामग्री तसेच भविष्यामधील आॅर्डर मिळण्याबाबतची अनिश्चितता या बाबींमुळे एमएसएमई तसेच अन्य व्यावसायिकांना यापुढे व्यवसाय चालणे कठीण असल्याचे वाटत आहे. मात्र, यासाठी केवळ कोरोनाचे लॉकडाऊन हेच कारण नाही. याआधीपासूनच एमएसएमई व छोट्या उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच हे उद्योग बंद पडू शकतील, असे मत या उद्योजकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या