शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

३२१ कोटींचा नवा घोटाळा, नीरव मोदीवर दुसरा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 05:09 IST

पंजाब नॅशनल बँकेस आणखी ३२१ कोटी रुपयांना गंडा घातल्याबद्दल फरार हिरे व्यापारी नीरव मोदीविरुद्ध सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला आहे. ही फिर्याद २०१३ ते २०१७ या काळातील कर्जव्यवहारांची आहे. दरम्यान, नीरव मोदी व मेहूल चोकसी यांनी...

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेस आणखी ३२१ कोटी रुपयांना गंडा घातल्याबद्दल फरार हिरे व्यापारी नीरव मोदीविरुद्ध सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला आहे. ही फिर्याद २०१३ ते २०१७ या काळातील कर्जव्यवहारांची आहे. दरम्यान, नीरव मोदी व मेहूल चोकसी यांनी केलेल्या गैरव्यवहारांशी संबंधित अनेक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे बँकेने म्हटल्याचे कळते.नव्या घोटाळ्यात मोदीखेरीज फायरस्टार डायमंड््स इंटरनॅशनल कंपनीचा माजी वित्त संचालक विपुल अंबानी, मुख्य वित्तीय अधिकारी रवि गुप्ता, कंपनीचे अन्य संचालक, अधिकारी, बँकेतील कर्मचाºयांना आरोपी केले आहे. सोलर एक्सपोर्ट््स, स्टेलर डायमंड््स व डायमंड आर यूज या मोदीच्या भागीदारी फर्म व फायरस्टार समूह यांच्यात मोठ्या रकमांच्या फिरवा फिरवीचे व्यवहार झाल्याचे चौकशीत दिसून आले. फायरस्टार डायमंड्स व फायरस्टार इंटरनॅशनल यांची खाती बँकेने बोगस ठरविली असून, रिझर्व्ह बँकेसही तसे कळविले आहे.याआधी १४ व २६ फेब्रुवारी रोजी बँकेने केलेल्या अनुक्रमे १२,६०० कोटी व १,३०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांच्या तक्रारींवरून पहिला गुन्हा नोंदला गेला आहे. याखेरीज सीबीआयने मेहूल चोकसी याच्या गीतांजली कंपनी समूहाविरुद्ध ४,८८६ कोटी रुपयांच्या घोटाळ््याचा स्वतंत्र गुन्हा १५ फेबु्रवारी रोजी नोंदविला आहे.चोकसीचाही नकारमेहूल चोकसी याने सीबीआयला पत्र लिहून आजारपण व कामाचा व्याप यामुळे आपण परत येऊ शकत नाही. आपला पासपोर्टही रद्द केला असल्याचे कळविले आहे. मोदीप्रमाणे चोकसीनेही सीबीआयने आपले भारतातील व्यवसाय बंद करून, बँक खाती गोठवून व संपत्तीवर टाच आणून आपले नुकसान केल्याची ओरडही त्याने केली आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीCrimeगुन्हा