शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! मणिपूरमध्ये २ महिलांची नग्न धिंड काढणाऱ्याला अटक; व्हिडीओ समोर येताच देशभर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 17:32 IST

manipur violence news : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं.

नवी दिल्ली : हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमध्ये पुन्हा एकदा देशाला लाजवेल अशी घटना घडली. कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही जण २ महिलांची नग्न धिंड काढत असल्याचे दिसत आहे. धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. लक्षणीय बाब म्हणजे महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या ३२ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली असून हेरोदास मेईतेई असे आरोपीचे नाव आहे.

वृत्तसंस्थान एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुख्य आरोपी ज्याने हिरवा टी-शर्ट घातलेला होता त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने नग्न महिलेला पकडून ठेवले होते. त्याला आज सकाळी ओळख पटल्यानंतर एका कारवाईत अटक करण्यात आली. आरोपीचे नाव हुइरेम हेरोदास मेईतेई (३२) असे आहे. अशी माहिकी सरकारी सूत्रांनी दिली आहे.

मोदींचे आश्वासन बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोनं अनेकांना धक्का बसला. मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करून छळ करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ माजली. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. नरेंद्र मोदी यांनी ही घटना लज्जास्पद असल्याचे म्हटले आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

"१५ वर्षांच्या मुलाकडून ४० वर्षीय महिलेवर अत्याचार, व्हिडीओ आला नसता तर PM बोलले नसते"

अमित शहांचे मुख्यमंत्र्यांना निर्देशमणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासंदर्भात गृहमंत्री, अमित शाह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच, व्हिडीओ प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. यातच, घटनेतील मुख्य आरोपीला थाउबल येथून अटक केल्याचेही समजते. तसेच इतर आरोपींचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारArrestअटकsexual harassmentलैंगिक छळ