शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

31 डिसेंबरपर्यंत या सेवांशी आधार कार्ड जोडाच, अन्यथा हे होणार तोटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 12:28 IST

आर्थिक तसंच इतर कुठल्याही व्यवहारासाठी सरकारने आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक केलं आहे.

ठळक मुद्देआर्थिक तसंच इतर कुठल्याही व्यवहारासाठी सरकारने आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक केलं आहे. गुंतवणुकीपासून ते बँक अकाऊंटचा वापर करण्यासाठी तसंच मोबाइल फोन वापरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे.

मुंबई- आर्थिक तसंच इतर कुठल्याही व्यवहारासाठी सरकारने आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक केलं आहे. गुंतवणुकीपासून ते बँक अकाऊंटचा वापर करण्यासाठी तसंच मोबाइल फोन वापरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. बँका, मोबाइल नेटवर्किंग कंपन्या तसंच इतर अनेक ठिकाणांहून ग्राहकांना आधार लिंक करण्याचे अलर्टही यायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सरकारकडून देण्यात आलेल्या डेडलाईनमध्ये तुम्हाला ही महत्त्वाची कामं करणं गरजेचं आहे.  काही ठिकाणी आधारा कार्ड लिंक करण्याची तारीख 31 डिसेंबर देण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरच्या आधी आधार लिंक न करणाऱ्यांना अनेक तोट्यांना सामोरं जावं लागणार आहे. 

आधारकार्ड पॅनकार्डशी करा लिंक (शेवटची तारीख 31 डिसेंबर)आधारकार्डचा नंबर पॅनकार्डशी लिंक करणं सरकारने बंधनकारक केलं आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही आधार-पॅन लिंक केलेलं नाही त्यांच्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत आधार-पॅनकार्ड लिंक करा. आधारकार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर आयटी रिटर्न फाइल करता येणार नाही. आयटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया होणार नाही.

आधारकार्ड बँक अकाऊंट नंबरशी करा लिंक (शेवटची तारीख 31 डिसेंबर)आधारकार्ड बँक अकाऊंटशी लिंक करणंही सरकारकडून बंधनकारक करण्यात आलं आहे. बँक अकाऊंट नंबर आधारशी लिंक नसेल तर खातेधारकाचं अकाऊंट ब्लॉक केलं जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील हा तोटा टाळण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत तुमचा बँक अकाऊंट नंबर आधारकार्ड नंबरशी लिंक करा.

म्युच्युअल फंडात पैसे गुंतविणाऱ्यांनीही  करा आधार लिंक  (शेवटची तारीख 31 डिसेंबर)म्युच्युअल फंडात ज्यांनी पैसे गुंतविले आहेत त्यांनाही आधार लिंक करणं सक्तीचं आहे. तसं न केल्यास तुमचं म्युच्युअल फंडाचं खातं गैर ठरवलं जाणार आहे. ज्याचं आधारकार्ड लिंक नसेल त्यांचं खातं नॉन ऑपरेटेबल होणार आहे.

इन्श्युरन्स पॉलिसी धारकांनीही करा आधारकार्ड लिंक  (शेवटची तारीख 31 डिसेंबर)इन्श्युरन्स पॉलिसी धारकांनाही आधारकार्ड नंबर लिंक करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही लिंक केलेलं नाही त्यांना 31 तारखेपर्यंत आधारकार्ड लिंक करणं गरजेचं आहे. तसं न केल्यास इन्श्युरन्स पॉलिसीचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही.

पोस्टाशी संबंधित काम   (शेवटची तारीख 31 डिसेंबर)पोस्टाशी संबंधित गोष्टी म्हणजेच पीपीएफ, केव्हीपी, ठेवी अशा विविध सुविधांसाठी आधारकार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. 31 डिसेंबरपर्यंत आधार लिंक केलं नाही तर खातेधारकाचं खातं ब्लॉक होणार आहे.

मोबाइल नंबर करा आधारकार्डशी लिंक (शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2018)मोबाइल नंबर आधारकार्डशी लिंक करणं बंधनकारक आहे. त्यासाठी शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2018 देण्यात आली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत ग्राहकांना मोबाइल नंबर आधारशी लिंक करायचा आहे. तसं न केल्यास तुमचा मोबाइल नंबर डीअॅक्टीवेट केला जाईल.

एलपीजी, पेन्शन सारख्या सुविधांसाठी आधार कार्ड लिंक सक्तीचं (शेवटची तारीख 31 मार्च 2018) एलपीजी, पेन्शन यासारख्या सरकारी सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. त्यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च देण्यात आली असून आधार लिंक नसेल तर सरकारी योजनांपासून मुकावं लागणार आहे.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड