शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

मंकीपॉक्स हातपाय पसरू लागला, दिल्लीत चौथा रुग्ण आढळला; देशात एकूण ९ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 21:59 IST

भारतात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत एका ३१ वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. त्याचवेळी, आता देशात मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.

भारतात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत एका ३१ वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. त्याचवेळी, आता देशात मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. दिल्लीत आतापर्यंत मंकीपॉक्सचे चार रुग्ण समोर आले आहेत. लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात प्रथमच एक महिला मंकीपॉक्स पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ही महिला मूळची नायजेरियाची असून, सध्या ती पश्चिम दिल्लीत राहात होती. एका दिवसापूर्वीच महिलेला डीडीयू रुग्णालयातून लोकनायक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 

दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, गरज भासल्यास रुग्णालय आणि आयसोलेशन रूमची संख्या आणखी वाढवता येईल. या सर्व रुग्णालयांमध्ये मंकीपॉक्सच्या संसर्गाशी लढा देण्यासाठी, WHO ने ठरवून दिलेली मानकं लक्षात घेऊन सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

दिल्ली सरकार सतर्कमंकीपॉक्सच्या वाढत्या केसेस पाहता दिल्ली सरकारनं तयारी तीव्र केली आहे. यासाठी दिल्ली सरकारनं लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात २० आयसोलेशन रूम, गुरुतेग बहादूर हॉस्पिटलमध्ये १० आयसोलेशन रूम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये १० आयसोलेशन रूम आरक्षित केल्या आहेत. एवढेच नाही तर कैलाश दीपक हॉस्पिटल, एमडी सिटी हॉस्पिटल आणि बत्रा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तुघलकाबादसह सरकारी हॉस्पिटलमध्ये तसेच तीन खासगी हॉस्पिटलमध्ये 10-10 आयसोलेशन रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.

जगभरात 16 हजारांहून अधिक रुग्ण23 जुलैपर्यंत जगभरातील 75 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 16 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलं आहे. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे नऊ रुग्ण समोर आले आहेत, त्यापैकी चार दिल्लीतील आहेत. यातील दोन रुग्णांवर लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात उपचार सुरू होते. एक रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला सोमवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आला.

टॅग्स :delhiदिल्लीWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना