शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

१०० किमी पायी प्रवास, महाराष्ट्राच्या बाजूने घुसले जवान अन्... ३१ जहाल नक्षलवाद्यांचा बैठकीतच खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:25 IST

छत्तीसगडच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले होते.

31 Naxlists killed :  छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. महाराष्ट्राच्या सीमेवरुन सुरू करण्यात आलेल्या कारवाईने नक्षलवादी हैराण झाले. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले, तर दोघे जखमी झाले. रविवारी इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात एका टेकडीवर ही चकमक झाली. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक धोकादायक आणि ११ महिलांचाही समावेश होता.

अबुझमाडला लागून असलेले इंद्रावती राष्ट्रीय उद्यान हे नक्षलवाद्यांचे महत्त्वाचं ठिकाण आहे. २७९९.०८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे उद्यान महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. १९८३ मध्ये इंद्रावती नॅशनल पार्कला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं होतं. मात्र हे बऱ्याच काळापासून नक्षलवाद्याचे आश्रयस्थान बनलं होतं. रविवारी झालेल्या कारवाईत तब्बल ३१ नक्षलवाद्यांना ठार करण्याच सुरक्षा दलाला यश आलं. काही दिवसांपूर्वीच या जंगलात तीन नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यात आला होता.

आम्हाला तेलंगणा राज्य समिती, पश्चिम बस्तर विभाग आणि नॅशनल पार्क एरिया कमिटीमधल्या नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. त्यांनी इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात टॅक्टिकल काउंटर ऑफेंसिव्ह कॅम्पेनआधी एक बैठक बोलावली होती. नक्षलवादी मार्च ते जून दरम्यान टॅक्टिकल काउंटर ऑफेंसिव्ह कॅम्पेन करतात, ज्या दरम्यान ते त्यांच्या कारवाया वाढवतात.

७ फेब्रुवारी रोजी छत्तीसगड पोलिसांच्या तुकड्या, जिल्हा राखीव रक्षक, स्पेशल टास्क फोर्स आणि बस्तर फायटर यांना या भागाच्या वेगवेगळ्या दिशेने पाठवण्यात आले होते. "स्ट्रॅटेजी म्हणून सरप्राईज एलिमेंटचा वापर करण्यात आला. इंद्रावती नॅशनल पार्कमधील महाराष्ट्र पोलिसांच्या लॉन्चिंग पॅडवरून काही टीम्सना पाचारण करण्यात आले होते," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रविवारी सकाळी गस्ती पथके नक्षलवादी दिसतील अशा टेकडीवर पोहोचली. टेकडीला घेरून सुरक्षा कर्मचारी पुढे जात राहिले आणि सकाळी ८ वाजता गोळीबार सुरू झाला. गोळीबारादरम्यान नक्षलवादी दोन गटात विभागले गेले. तेलंगणा समिती कॅडर असलेल्या एका गटाने माघार घ्यायला सुरुवात केली, तर दुसऱ्या गटाने गोळीबार सुरूच ठेवला. तितक्यात महाराष्ट्राच्या बाजूने घुसलेल्या पथकाला पाहून नक्षलवाद्यांना धक्का बसला. कारण एवढ्या मोठ्या संख्येने सुरक्षा दल येईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. संध्याकाळी चारपर्यंत अधूनमधून गोळीबार सुरूच होता.

ही चकमक घडली ते ठिकाण बिजापूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ८० किमी आणि महाराष्ट्र सीमेपासून ४० किमी अंतरावर आहे. तीन दिवसांच्या कारवाईनंतर सुमारे १०० किलोमीटर चालत सुरक्षा दल तिथं पोहोचलं होतं. मारले गेलेले नक्षलवादी, शहीद सैनिक आणि जखमींचे मृतदेह एअरलिफ्ट करण्यात आले.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादीMaharashtraमहाराष्ट्र