शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
2
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
3
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
4
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
5
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
6
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
7
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
8
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
9
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
10
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
11
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
12
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
13
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
14
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
16
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
17
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
18
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
19
“न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गौरी पालवे कुटुंबीयांची भेट
20
तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे; दिव्यांगांसाठी विशेष शो करा, सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश
Daily Top 2Weekly Top 5

३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:30 IST

Vande Bharat Express Train News: देशभरात २० कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनच्या यादीत आणखी एका वंदे भारत ट्रेनचा समावेश होणार आहे.

Vande Bharat Express Train News: देशभरात आताच्या घडीला सुमारे १६० वंदे भारत एक्स्प्रेसच्या सेवा सुरू आहेत. प्रवाशांचा वंदे भारत ट्रेनला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतीय रेल्वेची आताच्या घडीला सर्वांत लोकप्रिय ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस आहे. प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आणि वाढती मागणी पाहता देशातील अनेक वंदे भारत ट्रेनचे कोच वाढवण्यात आले आहेत. आणखीही काही वंदे भारत ट्रेनचे कोच वाढवले जाणार आहेत. यातच एका वंदे भारत ट्रेनला कायमस्वरुपी चार कोच वाढवण्यात आले आहेत. 

प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हुरूपलेल्या मध्य रेल्वे प्रशासानाने नागपूर-इंदोर वंदे भारत एक्सप्रेसची प्रवासी आसन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता या ट्रेनला आणखी आठ कोच जोडले जाणार आहे. गाडी क्रमांक २०९१२/२०९११ नागपूर-इंदोर-नागपूर एक्सप्रेसला भरभरून प्रवासी मिळत असल्याने या गाडीमध्ये अनेकदा आसने उपलब्ध नसतात. सध्या या गाडीला आठ कोच आहेत. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना वेटिंगवर राहावे लागते. ही स्थिती लक्षात आल्याने या गाडीला आणखी कोच जोडून आसन क्षमता वाढविण्यावर अनेक दिवसांपासून विचार सुरू होता. तसा प्रस्तावही रेल्वे बोर्डाकडे गेला होता. त्याला अखेर मंजूरी मिळाली. यासह तिरुपती वंदे भारत ट्रेनला कायमस्वरुपी चार कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तिरुपती वंदे भारत ट्रेनच्या कोचची संख्या २० होणार आहे. 

३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार

वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत मार्गावर शेकडो जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक २०७०१  सिकंदराबाद ते तिरुपती आणि ट्रेन क्रमांक २०७०२ तिरुपती ते सिकंदराबाद या वंदे भारत ट्रेनला चार अतिरिक्त वातानुकूलित चेअर कार कोच जोडले जाणार आहेत. यामुळे या वंदे भारत ट्रेनमध्ये आता ३०० सीट वाढतील आणि कोचची संख्या १६ वरून २० होणार आहे. 

दरम्यान, ही वंदे भारत ट्रेन सध्या आठवड्यातून सहा दिवस धावते. मंगळवारी या वंदे भारत ट्रेनची सेवा नसते. सिकंदराबादहून ही ट्रेन सकाळी ६ वाजता सुटते. तर परतीच्या प्रवासासाठी ही ट्रेन तिरुपतीहून दुपारी सव्वा तीन वाजता निघते आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी सिकंदराबादला पोहोचते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Bharat Express: Increased coaches due to passenger demand

Web Summary : Due to high demand, Vande Bharat trains are adding coaches. Nagpur-Indore Vande Bharat will get eight more. Tirupati Vande Bharat permanently adds four, increasing seats by 300 and coach count to 20.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटIndian Railwayभारतीय रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी