शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्रात सापडला १८०० कोटी रुपयांचा ड्रग्स साठा; गुजरात ATS अन् कोस्ट गार्डला मोठं यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 09:50 IST

सागरीमार्गे ड्रग्स आणि अन्य नशेचे पदार्थ तस्करी रोखण्यासाठी मागील वर्षी २०२४ मध्ये ऑपरेशन सागर मंथन सुरू करण्यात आले होते.

अहमदाबाद - गुजरातच्या समुद्रात पुन्हा एकदा ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. अरबी समुद्रात जवळपास ३०० किलो ड्रग्स पकडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत १८०० कोटी रुपये आहे. गुजरात एटीएस आणि इंडियन कोस्ट गार्डच्या संयुक्त कारवाईत हे मोठे यश मिळालं आहे. इंडियन कोस्ट गार्डने १२-१३ एप्रिलच्या रात्री गुजरात एटीएससोबत मिळून किनारपट्टीवर १८०० कोटी रुपये किंमतीचे ३०० किलो ड्रग्स ताब्यात घेतले. 

समुद्रात फेकून पळाले तस्कर

तस्करांनी आयसीजी जहाज पाहताच निर्बंध असलेले साहित्य समुद्रात फेकले आणि तिथून पळून गेले. कोस्ट गार्डच्या जवानांनी समुद्रातून ड्रग्सचा साठा जप्त करत पुढील चौकशीसाठी गुजरात एटीएसकडे सुपूर्द केले. ड्रग्स तस्करांविरोधात संयुक्त मोहीम आखून सरकारी यंत्रणांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा पकडला. 

सागरीमार्गे ड्रग्स आणि अन्य नशेचे पदार्थ तस्करी रोखण्यासाठी मागील वर्षी २०२४ मध्ये ऑपरेशन सागर मंथन सुरू करण्यात आले होते. त्यात NCB ऑपरेशन ब्रांचचे अधिकारी, भारतीय नौदलाची गुप्तचर यंत्रणेसह इंडियन कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएसचा समावेश करण्यात आला होता. या ऑपरेशन सागर मंथन अंतर्गत मागील वर्षी एकूण ३४०० किलो ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला होता. त्याशिवाय ११ इराणी नागरिक आणि १४ पाकिस्तानी नागरिकांनाही अटक करण्यात आली  होती. 

ऑपरेशन सागर मंथन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नशेच्या पदार्थाविरोधात सुरू केलेली मोहीम होती. या अंतर्गत विविध तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून संयुक्त कारवाई करण्यापासून सागरी मार्गे येणाऱ्या ड्रग्सच्या तस्करीला आळा घालण्यासाठी कारवाई केली जाते. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ