शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

300 काश्मिरी पंडित पुन्हा येणार खोऱ्यात, तीन दशकांनंतर करणार पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 08:16 IST

दहशतवाद्यांच्या कारणास्तव काश्मीर सोडणाऱ्या काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा मातीशी जोडण्याची संधी मिळाली आहे.

श्रीनगरः दहशतवाद्यांच्या कारणास्तव काश्मीर सोडणाऱ्या काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा मातीशी जोडण्याची संधी मिळाली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी श्रीनगरजवळच्या खीर भवानी आईच्या पूजेसाठी या काश्मिरी पंडितांना आमंत्रण पाठवलं आहे. सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या आमंत्रणानंतर काश्मिरी पंडितांनी आनंद व्यक्त केला आहे. या संधीकडे घरवापसीच्या दृष्टीनं पाहिलं जात आहे.सात लाख एवढी लोकसंख्या असलेले काश्मिरी पंडित 1990चा काळ विसरू शकत नाहीत. 30 वर्षांची दीपिका सांगते, आता आमची घरवापसी नाही, परंतु आम्हाला पुन्हा काश्मिरात वास्तव्य करायला मिळेल, अशी आशा आहे. आई भवानीचं दर्शन करणं ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. काश्मीरच्या तरुण पिढीसाठी ही बाब महत्त्वाची आहे. कारण काश्मीरच्या तरुण पिढीनं काश्मिरी पंडितांना कधीही पाहिलेलं नाही.58 वर्षीय दीपक कौल आणि त्यांची पत्नी भारती कौल यांनी स्वप्न साकार होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. ही काही दिवसांची यात्रा कौल कुटुंबीयांना घरवापसीसारखीच वाटत आहे. 1990च्या नरसंहारानंतर रातोरात घर सोडणाऱ्या काश्मिरी पंडितांसाठी हा दिवस अविस्मरणीय आहे. जम्मू-काश्मीर भवनापासून ही यात्रा 10 जून रोजी आई खीर भवानीच्या दर्शनासाठी रवाना होणार आहे. प्रवाशांचा खर्च आणि सुरक्षेची जबाबदारी राज्यपालांनी घेतली आहे. या यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य सरकारला प्रवाशांची संख्या आधीच सोपवलेली आहे. खीर भवानी आईच्या दर्शनानंतर हरी पर्वत श्रीनगर, शंकराचार्य मंदिर असा प्रवास करत हे यात्रेकरू पुन्हा 13 जून रोजी दिल्लीत दाखल होणार आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर