शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! दहशतवादी प्रशिक्षणासाठी भारतातून पाठवल्या गेल्या ३०० मुली; कोण आहेत या मुली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 05:36 IST

देशाच्या वेगवेगळ्या भागांतून सुमारे ३०० मुलींना मध्य-पूर्व देशांच्या मार्गे पाकिस्तानात पाठविण्यात आल्याचा संशय केंद्रीय यंत्रणांना आहे.

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली :

देशाच्या वेगवेगळ्या भागांतून सुमारे ३०० मुलींना मध्य-पूर्व देशांच्या मार्गे पाकिस्तानात पाठविण्यात आल्याचा संशय केंद्रीय यंत्रणांना आहे. या मुलींना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात येईल. या दृष्टीने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सतत अशांतता राहावी यासाठी पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संघटनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोण आहेत या मुली?राज्यातील यंत्रणा हरवलेल्या व्यक्तींचे रजिस्टर धुंडाळून यातील किती मुली परत मिळाल्या याचा तसेच हरविल्या, पण त्याची नोंद नाही, याची माहिती काढण्यात येत असल्याचे समजते. धर्मांतर करून लग्न केलेल्या मुलींचा विशेष करून लग्न करून परदेशी रवाना झालेल्या मुलींचा ठावठिकाणा शोधण्यात येत आहे, अशीही माहिती मिळते आहे.

राज्यांना अलर्टनिर्यात केलेल्या मुलींची संख्या ३०० पर्यंत असावी असा अंदाज व्यक्त करीत यात धर्मांतरीत मुलींचाही यामध्ये समावेश असण्याची शक्यता केंद्रीय यंत्रणांनी वर्तवली आहे. या दृष्टीने सर्व राज्यांना महिनाभरापूर्वीच सतर्क करण्यात आले आहे.

- १०० मुलींना यापूर्वी दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. - ७०० महिलांना पाकिस्तानच्या विविध भागांतील कॅम्पमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत असल्याचे २००९ मध्ये समोर आले होते.मोहाली बॉम्बहल्ल्यामागे आयएसआयचा हात९ मे २०२२ रोजी मोहाली येथे पंजाब पोलिसांच्या गुप्तवार्ता विभाग मुख्यालयावर बॉम्बहल्ला झाला. यासाठी रॉकेटचा उपयोग करण्यात आला होता. यामागे आयएसआयचा हात असल्याचे विविध यंत्रणांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

सौंदर्याला प्राधान्यमुलींना सीमापार पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली. यासाठी मुलींच्या सौंदर्याला प्राधान्य दिल्याचाही यंत्रणांना संशय. हनी ट्रॅपसाठी वापरप्रशिक्षणानंतर दहशतवादी हल्ले व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये ओढण्यासाठी त्यांचा वापर  केला जाऊ शकतो, असा अंदाज आहे.

टॅग्स :TerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान