शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

नीरव मोदीप्रकरणी काँग्रेसचे 30 आमदार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 10:02 PM

नीरव मोदी प्रकरणात छत्तीसगड विधानसभेतील काँग्रेसच्या 30 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेले आमदार हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या विरोधात सभागृहात विरोध प्रदर्शन करत होते.

छत्तीसगड- नीरव मोदी प्रकरणात छत्तीसगड विधानसभेतील काँग्रेसच्या 30 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेले आमदार हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या विरोधात सभागृहात विरोध प्रदर्शन करत होते. राज्यात गुंतवणूक करणा-या रमन सिंह यांच्या मालकीच्या मेटल्स अँड मायनिंग कॉर्पोरेशननं रिओ टिंटो कॉर्पोरेशनला आमंत्रण दिल्याचा कारणावरून विरोधक आमदारांनी छत्तीसगड विधानसभेत मोठा गोंधळ घातला.रिओ टिंटो कॉर्पोरेशनचं पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी यांच्याबरोबर लागेबांधे असल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. दुसरीकडे नीरव मोदीवर 114 अब्ज रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला जातोय. नीरव मोदीनं 17 बँकांमध्ये जवळपास 3 हजार कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप होतोय. नीरव मोदीनं हवाला रॅकेटसाठी या पैशाचा वापर केल्याचीही शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.कोण आहे नीरव मोदी सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला. घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाले. नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याने 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरू केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत.  

47 वर्षीय नीरवचे वडील देखील हिरे व्यापारीच होते.  नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला.  नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.मल्ल्यापेक्षाही मोठा घोळयाबाबत सीबीआयच्या सूत्रांनी स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. मात्र आधी २८० कोटी रुपये व आता ११,५०० कोटी रुपये, या दोन्ही घोटाळ्यांची कार्यपद्धती सारखीच आहे. त्यामुळे आता सीबीआयने या संपूर्ण घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. हा विजय मल्ल्यापेक्षाही मोठा बँक घोटाळा आहे, असे सांगण्यात आले. तीन बँका संकटातया घोटाळ्यात संबंधितांनी विदेशात राहून अन्य बँकांकडून कर्जे घेतल्याचे पंजाब नॅशनल बँकेने पत्रात नमूद केले आहे. अन्य बँकांमध्ये अलाहाबाद बँक, युनियन बँक आॅफ इंडिया व खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेचा समावेश असल्याचे बोलले जाते. सर्वसामान्यांची रक्कम धोक्यातपीएनबीमध्ये रिझर्व्ह बँक व सर्वसामान्य ठेवीदार यांच्यामार्फत पैसा येतो. समभागधारकांचाही पैसा बँकेत आहे. घोटाळ्याची तक्रार करताना बँकेने ‘संशयास्पद व्यवहार’ असा उल्लेख केला आहे. ही खाती सर्वसामान्य ठेवीदारांची असून घोटाळा केलेल्यांची नावेही बँकेला माहीत नाहीत. 

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदी