शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अरे देवा! 3 वर्षीय चिमुकल्याने गिळली गणपतीची मूर्ती, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 15:39 IST

3 year old boy swallows ganesha idol : एका चिमुकल्याने गणपती बाप्पाची मूर्ती गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूर्ती गिळल्यानंतर मुलाची प्रकृती गंभीर झाली.

नवी दिल्ली - मुलांची योग्य काळजी न घेणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हे अनेकदा घातक ठरत आहे. अशीच एक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. एका चिमुकल्याने गणपती बाप्पाची मूर्ती गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूर्ती गिळल्यानंतर मुलाची प्रकृती गंभीर झाली. एक्स-रे रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. डॉक्टरांनी अजिबात वेळ वाया न घालवता एक्स-रेच्या माध्यमातून मूर्ती कुठे आहे याचा शोध घेतला आणि ती लवकरात लवकर बाहेर काढून मुलाची जीव वाचवला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या बंगळुरूमधील तीन वर्षीय चिमुकल्याने सुमारे 5 सेंटीमीटर लांबीची गणेश मूर्ती गिळली होती. प्रकृती बिघडल्याने या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे उपचारानंतर मुलाला वाचवण्यात यश आलं. मुलावर बंगळुरूच्या मणिपाल रुग्णालयात उपचार केले गेले. या मुलाने खेळताना गणपती बाप्पाची छोटी मूर्ती गिळली. नंतर मुलाच्या छातीमध्ये दुखू लागलं तसेच त्याला लाळ गिळतानाही त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी छाती आणि गळ्याचा एक्स रे काढला असता मुलाच्या शरीरात गणपतीची मूर्ती असल्याचं दिसून आलं. 

डॉक्टरांनी एंडोस्कोपीचा वापर करत ऑपरेशन करून त्याच्या शरीरातून ही मूर्ती बाहेर काढली. ऑपरेशननंतर काही तासातच त्याला डिस्चार्जही देण्यात आला. मूर्तीमुळे मुलाच्या अन्ननलिकेला इजा झाली होती. तसेच त्याच्या छातीमध्येही दुखत होतं त्यामुळे त्याला गिळताना त्रास होत होता. डॉ. मनीष राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मुलाला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. मात्र, तात्काळ उपचार मिळाल्यामुळे त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली आणि त्याला वाचवणं शक्य झालं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भारीच! 'ती' हनुमान चालिसा म्हणत होती अन् डॉक्टरांनी केलं 'मेंदूचं ऑपरेशन'; Video व्हायरल 

 दिल्लीतील एम्सच्या न्यूरो एनेस्थेटिक टीमला  (Neuro Anaesthetic) एक मोठं यश मिळालं आहे. डॉक्टरांच्या टीमने एका 24 वर्षीय तरुणीला पूर्ण बेशुद्ध न करताच तिच्या मेंदूचं ऑपरेशन केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही सर्जरी यशस्वी झाली आहे. ऑपरेशनचा एक व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. एम्स रुग्णालयातीलडॉक्टर ऑपरेशन करत होते आणि तरुणी स्वतःवर ऑपरेशन होत असताना हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणत होती. सर्वत्र डॉक्टरांच्या टीमचं भरभरून कौतुक केलं जात आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलIndiaभारत