शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 24 तासांत 3 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 11:15 IST

Jammu-Kashmir : कुलगाममध्ये काल (11 नोव्हेंबर) सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक AK-47 रायफल जप्त करण्यात आली आहे.

श्रीनगर:  जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू असून गेल्या 24 तासांत चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा  (Terrorists Neutralized) करण्यात आला आहे. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम (Kulgam) जिल्ह्यात चकमक सुरू असून जम्मू-काश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप(SOG), लष्कराचे 9 राष्ट्रीय रायफल्स जवान आणि सीआरपीएफचे जवान यांनी संयुक्तरित्या ही कारवाई सुरू केली आहे, तर श्रीनगरमधील (Srinagar) चकमक संपली आहे.

कुलगाममध्ये काल (11 नोव्हेंबर) सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक AK-47 रायफल जप्त करण्यात आली आहे. तत्पूर्वी संध्याकाळी जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले होते. कुलगाममध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे हिजबुल कमांडर शिराज मौलवी आणि यावर भट्ट अशी आहेत.

गुरुवारी दुपारी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील चावलगाममध्ये सुरक्षा दलांना 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने लष्कराच्या 9 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या जवानांसोबत संयुक्त शोध मोहीम सुरू केली. यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, परंतु ते तयार झाले नाहीत. यावेळी प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला. यानंतर आज सकाळी सुरक्षा दलांनी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.

 

श्रीनगरमध्ये एका दहशतवाद्याला केले ठारयाशिवाय, शोध मोहीम संपलेल्या श्रीनगरच्या बेमिना येथेही एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव अमीर रियाज असून तो मुजाहिदीन गजवतुल हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. आमिर रियाझ हा पूर्वी लेथपोरा येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी