शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशात ३ नवे एम्स, १५७ मेडिकल कॉलेज; नागपुरात नवे एम्स; गोंदिया, नंदुरबार जिल्ह्यात कॉलेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 06:29 IST

नागपूर येथे नवीन एम्स स्थापन करण्यात येणार

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात ३ नवीन एम्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एम्सची एकूण संख्या २२ होणार आहे. याशिवाय देशात १५७ नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात नागपूर येथे नवीन एम्स स्थापन करण्यात येणार आहे. देशात सध्या १९ एम्स कार्यरत आहेत. बिहार आणि जम्मू- काश्मीर या दोन राज्यांत प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी दोन एम्स अनुक्रमे दरभंगा आणि अवनीपुरा येथे स्थापन करण्यात येणार आहेत. हरयाणात मनेठीत एक अतिरिक्त एम्स स्थापन करण्यात येणार आहे.नव्या १५७ मेडिकल कॉलेजपैकी गोंदिया आणि नंदुरबार जिल्ह्यात दोन मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात येणार आहेत. सर्वाधिक २७ मेडिकल कॉलेज उत्तर प्रदेशला मिळणार आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश १४, ओडिशा ७, राजस्थान १४, जम्मू- काश्मीर ७, प. बंगालमध्ये ११ याप्रमाणे नवे मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहेत. यासाठी २३ हजार कोटी रुपये तीन टप्प्यांत लागणार आहेत. मागास जिल्ह्यांना प्राधान्यकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सभागृहात सांगितले होते की, आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी हे मेडिकल कॉलेज आणि एम्स स्थापन करण्यात येणार आहेत. मागास जिल्ह्यांना यात प्राधान्य देण्यात येणार आहे. अनेक राज्यांत जमीन उपलब्ध होत नसल्याने या योजनांना उशीर होत आहे.