शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लष्करे तय्यबाच्या ८ दहशतवाद्यांना अटक; सोपोरमध्ये धमकीची भित्तीपत्रके लावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 06:33 IST

काश्मीरमधील काही भागांत पुन्हा निर्बंध लागू

श्रीनगर : काश्मीरमधील नागरिकांना धमकाविणारी भित्तीपत्रके लावल्याप्रकरणी बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातून लष्कर-ए-तय्यबाच्या (एलईटी) आठ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी अटक केली आहे. मोहरमनिमित्त नागरिकांनी मिरवणुका काढून त्यातून अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी मंगळवारी श्रीनगर व काश्मीरच्या काही भागांत निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले होते.

यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, काश्मिरी नागरिकांनी हरताळ पाळण्याचे आवाहन सोपोर व परिसरात लावण्यात आलेल्या भित्तीपत्रकांमध्ये करण्यात आले होते, तसे न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागण्याचा इशाराही दहशतवाद्यांनी दिला होता. सोपोरमध्ये गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अडीच वर्षे वयाच्या बालिकेसह एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसरात अधिक कडक बंदोबस्त ठेवला आहे.बाजारपेठा बंदच३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध त्या-त्या परिसरातील स्थितीनुसार शिथिल करण्यात किंवा पुन्हा लागू करण्यात येत आहेत. काश्मीरमध्ये खासगी वाहनांची वाहतूक सुरू झाली असली तरी सार्वजनिक वाहतूक सेवा व बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. अनेक भागांत बंदसदृश वातावरण आहे. सरकारी शाळा, कार्यालये उघडली असली तरी तिथे कमी उपस्थिती असते. खासगी शाळा बंद आहेत. मुलांच्या सुरक्षेच्या काळजीमुळे त्यांना शाळेत पाठविण्यास पालक तयार नाहीत.भारत-पाक तणाव काहीसा निवळला - ट्रम्पवॉशिंग्टन : भारत व पाकिस्तानमध्ये दोन आठवड्यांपूर्वी होता तितका तणाव आता राहिलेला नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. दक्षिण आशियातील या शेजारी राष्ट्रांमधील तणाव कमी होण्यासाठी अमेरिका सहकार्य करण्यास तयार आहे, असेही त्यांनी पुन्हा म्हटले आहे.

जी-७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्समध्ये भेट झाली होती. त्यानंतर प्रथमच ट्रम्प यांनी भारत व पाकिस्तानमधील मतभेदांबाबत हे वक्तव्य केले आहे. व्हाईट हाऊस येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, काश्मीर प्रश्नावरून भारत व पाक तणाव वाढला होता.

काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने रद्द केले. जम्मू-काश्मीर व लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भांडवल करण्याचा केलेला प्रयत्नही फोल ठरला. ३७० कलम रद्द करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी भूमिका अनेक देशांनी घेतली.मध्यस्थी भारताला अमान्यपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत काश्मीरप्रश्नी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी ट्रम्प यांनी दाखविली होती. तसा प्रस्ताव आपण ठेवल्याचे दोन्ही देशांना माहिती आहे, असेही ट्रम्प म्हणाले होते. मात्र, मोदींबरोबर फ्रान्समध्ये झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी आपल्याच भूमिकेपासून घूमजाव केले. काश्मीर प्रश्न भारत व पाकिस्तानने चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, असे त्यांनी म्हटले आहे. काश्मीर प्रश्नी भारताला त्रयस्थ देशाची मध्यस्थी नको आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याबरोबरच्या बैठकीत स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा ट्रम्प चर्चेमध्ये सहकार्याची भाषा करीत आहेत.काश्मीरस्थित सीआरपीएफच्या हेल्पलाईनवर आपत्तीकाळात आले ३४ हजार फोन कॉल्सजम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) श्रीनगरस्थित आपत्तीकाळात मदतनीस (मददगार) दूरध्वनी कक्षात (हेल्पलाईन) ३४ हजारांहून अधिक फोन आले. यापैकी बव्हंशी काश्मीरमध्ये राहणाऱ्या आप्तजनांची ख्यालीखुशालीबाबत विचारणा करणारे होते.

५ ऑगस्टनंतर एकूण ३४ हजार २७४ फोन मदतनीस १४,४११ या दूरध्वनी क्रमांकावर आणि काही अन्य मोबाईल नंबरवर आले. बव्हंशी फोन काश्मीरमध्ये राहणारे नातेवाईक आणि कुटुंबाबाबत कुशल-मंगलबाबत आणि तेथील स्थितीबाबबत विचारणारे होते, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. १,२२७ फोन तातडीच्या निकडीसंदर्भात होते. अशा फोनची दखल घेऊन सीआरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी लोकांच्या घरी जाऊन फोन करणारी व्यक्ती आणि कुटुंबियांत संपर्क साधून देण्यात आला. दूरध्वनी मदतनीस कक्षातील सीआरपीएफच्या कर्मचाºयांनी स्थानिक लोकांच्याही घरी जाऊन त्यांना विमानाच्या तिकिटांचे वितरण, राज्याबाहेर शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा मुलाखतीच्या तारखांबाबत माहिती देण्यास विविध प्रकारे मदत केली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर