शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशात कोरोनाचे ३ लाख ८२ हजार ३१५ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 06:26 IST

देशात २० लाख कोरोना रुग्णांची संख्या ७ ऑगस्ट रोजी, ३० लाख २३ ऑगस्ट रोजी, ५ सप्टेंबर रोजी ४० लाख तर १६ सप्टेंबर रोजी ५० लाख झाली होती.

नवी दिल्ली :  देशात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे तीन लाख ८२ हजार ३१५ नवे रुग्ण नोंद झाले तर तीन हजार ७८० रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या आता दोन लाख २६ हजार १८८ तर एकूण रुग्णांची संख्या २,०६,६५,१४८ झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या ३४ लाख ८७ हजार २२९ आहे. एकूण बाधितांच्या संख्येत या रुग्णांचे प्रमाण १६.८७ टक्के आहे तर बरे होण्याचे प्रमाण ८२.०३ टक्के आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक कोटी ६९ लाख ५१ हजार ७३१ आहे तर मृत्यूचे प्रमाण घसरून १.०९ टक्के झाले आहे.

देशात २० लाख कोरोना रुग्णांची संख्या ७ ऑगस्ट रोजी, ३० लाख २३ ऑगस्ट रोजी, ५ सप्टेंबर रोजी ४० लाख तर १६ सप्टेंबर रोजी ५० लाख झाली होती. २८ सप्टेंबर रोजी ६० लाख, ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख, २९ ऑक्टोबर रोजी ८० लाख, २० नोव्हेंबर रोजी ९० लाख आणि १९ डिसेंबर रोजी १ कोटीची संख्या ओलांडली. ४ मे रोजी देशाने दोन कोटी रुग्णसंख्या गाठली. 

तामिळनाडूत चार तासात १० कोरोना रुग्णांचा मृत्यू

चेंगलपट्टू (तामिळनाडू) : चेंगलपट्टू सरकारी रुग्णालयात मंगळवारी रात्री चार तासात दहा कोविड रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यांच्या नातेवाईकांनी, रुग्णालयात प्राणवायूची टंचाई असल्यामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. चेंगलपट्टू जिल्ह्यात रोज सरासरी १५०० कोरोना रुग्णांची नोंद होत असून चेंगलपट्टू सरकारी रुग्णालयात जवळपास ५०० कोविड-१९ रुग्णांवर उपचार सुरू असल्यामुळेे द्रवरूप प्राणवायूची मागणी खूप वाढली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर तासाभरात ऑक्सिजनचा टँकर रुग्णालयात दाखल झाला.

२० मेपर्यंत निर्बंधकिती कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, हे शोधण्याचे काम सुरू असून प्राणवायूची टंचाई नाही, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे तमिळनाडूत सर्व राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर २० मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबई