जयललिता प्रकरण : बंगळुरुच्या विशेष न्यायालयाने दिलेली माहिती
बंगळुरू : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री व अद्रमुक नेत्या जयललिता यांनी मानसपुत्र व्ही एन सुधाकरन याला आता दूर केले असले, तरीही त्याच्या राजेशाही विवाहाची सर्व तयारी जयललिता यांनीच केली होती व त्यासाठी 3 कोटी रुपये खर्च केले होते, असे जयललिता यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीची चौकशी करणा:या बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने म्हटले होते.
सुधाकरनचा विवाह देशातील अनेक महागडय़ा विवाहापैकी सर्वाधिक खर्चाचा होता. 1995 साली जयललिता मुख्यमंत्री असताना झालेल्या या विवाहसमारंभात पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला, त्यावर बरीच टीका झाली, नागरिकांनी निदर्शने केली व न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
या विवाहासाठी काढलेल्या निमंत्रण पत्रिका, स्थानिक वृत्तपत्रत दिलेल्या आभाराच्या जाहिराती, तांबूल व निमंत्रितांना दिलेल्या महागडय़ा भेटी याचा खर्च नक्कीच 3 कोटींपेक्षा जास्त आला. हा अंदाज सर्व वस्तूंच्या किमती कमीत कमी लावल्यानंतर येतो, असे विशेष न्या. जॉन मायकेल डिकुन्हा यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात वस्तुस्थिती व परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर आरोपी क्र. 1 (जयललिता) यांनी आरोपी क्र. 3 (सुधाकरन) याच्या विवाहाच्या तयारीसाठी 3 कोटी रु. खर्च केले, असे न्या. डिकुन्हा म्हणाले. हा खर्च वधूच्या कुटुंबियांनी केला असा दावा त्यानी फेटाळून लावला आहे.
आरोपींनी सादर केलेल्या तोंडी
व कागदपत्रंच्या पुराव्यात अनेक
त्रुटी व परस्पर विरोधी माहिती
आहे. पुराव्यावरून असे दिसते की
हा सर्व खर्च जयललिता यांनी
केला व त्यांच्या आदेशानुसारच
सर्व तयारी करण्यात आली. जयललिता यांनी या विवाहासाठी 6 कोटी रुपये खर्च केले आहेत. (वृत्तसंस्था)
शाही विवाहासाठी केरळहून आणले होते गजराज
च्या विवाहासाठी झालेला एकूण खर्च 6 कोटी 45 लाख, 4 हजार 222 रु. असून, त्यातील 5 कोटी, 21 लाख 23 हजार 532 रु. मांडव घालण्यासाठी खर्च करण्यात आले. 4क् हजार ते 5क् हजार निमंत्रितांची सोय याअंतर्गत करण्यात आली.
च्केरळहून हत्ती आणण्यात आले, मोठय़ा प्रमाणावर आतषबाजी झाली. खाद्यपदार्थाची लयलूट झाली. मोठय़ा प्रमाणावर रोषणाई व झगमगाट करण्यात आला. याचा खर्च प्रचंडच झाला, असे सांगून न्या. डिकुन्हा पुढे म्हणाले सुधाकरन याच्या विवाहासाठी जयललिता यांनी हा खर्च केला.