शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धाडसी निर्णयांमागे १३० कोटी जनतेची प्रेरणा; चीनपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 06:16 IST

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे १00 दिवस : आव्हानांना कसे सामोरे जायचे हे सरकारला ठाऊक आहे

टेकचंद सोनवणे 

रोहतक : आमच्या सरकारने पहिल्या शंभर दिवसांत जे धाडसी निर्णय घेतले त्यामागे देशातील १३० कोटी जनतेची प्रेरणा होती असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले.

हरयाणामधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जाहीर सभा आयोजिण्यात आली होती. ते म्हणाले की, सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांत जे मोठे निर्णय घेतले त्याचा देशाला भविष्यात फायदा होईल. हे शंभर दिवस म्हणजे विकास, विश्वास व मोठ्या बदलांचे प्रतीक आहे. या कालावधीत राष्ट्रीय सुरक्षा, शेती या क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडविणारे निर्णय सरकारने घेतले आहेत. आव्हानांना कसे भिडायचे ते आमच्या सरकारला चांगलेच माहित आहे. संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात महत्त्वाची अनेक विधेयके संमत झाली.

संसदेच्या दोन्ही सभागृहांत कामकाजही व्यवस्थित पार पडले. अशी घटना देशाच्या संसदीय इतिहासात गेल्या ६० वर्षांत घडली नव्हती. याचे श्रेय सर्व पक्षांना दिले पाहिजे. मोदी यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर, लडाख किंवा पाण्याची उग्र बनलेली समस्या यासंदर्भात घेतलेल्या निर्णयांमागे देशातील जनतेची प्रेरणा होती. शेतकऱ्यांना पेन्शन ही महत्त्वाची योजना आहे. तशाच प्रकारचा लाभ लघु, मध्यम व्यावसायिकांनाही मिळणार आहे. चांद्रयान मोहिम-२मुळे संपूर्ण देशात इस्रोविषयी अभिमान उचंबळून आला व त्या भावनेने देश एकवटला गेला. या मोहिमेकडे सारा देश यशापयशाचा विचार न करता पाहात आहे. 

जागतिक बदलांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम नाहीनवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेत मोठ्या घडामोडी सुरू असल्या तरी भारतीय अर्थव्यवस्था भक्कम असल्याची ग्वाही केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. मोदी सरकारच्या काळात गतवर्षी चीनपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक भारतात आली. त्यामुळे लवकरच आपण ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मोदी सरकारच्या दुसºया कार्यकाळातील १०० दिवसांमधील महत्त्वाच्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली. ‘जन कनेक्ट’ या पुस्तकाचेही प्रकाशन त्यांनी केले.

१०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांची योजना मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना देईल, असे नमूद करून जावडेकर म्हणाले, उद्योजकांना केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले आहे. केवळ एका दिवसात स्वत:ची कंपनी सुरू करता येते. जीएसटीमध्ये लोकहितासाठी महत्त्वाचे बदल आम्ही केले. ग्रामीण भागासाठी घरांची योजना आणली. विशेष म्हणजे लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात मदत मिळते. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. ७ कोटी ३७ लाख शेतकºयांना त्या योजनेचा लाभ झाला, असेही जावडेकर म्हणाले. बँकांच्या विलीनीकरणावर जावडेकर म्हणाले, योग्य पद्धतीने विलीनीकरण झाले आहे. बँकिंग व्यवस्था भक्कम झाली. अर्थव्यवस्थेला गती मिळाली. जीडीपीच्या आकड्यांवर ‘ग्लोबल इकॉनॉमी इम्पॅक्ट्स सेंटिमेंट्स’ असे उत्तर जावडेकरांनी दिले. 

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकर