शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

2जी घोटाळा : उच्च न्यायालयात निर्णय पलटण्याची स्वामींना आशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 19:25 IST

2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र या प्रकरणात आज आलेल्या निकालामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. दरम्यान, या प्रकरणात सरकारने निकालाविरोधात उच्च न्यायलात दाद मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वामी यांनी दिली आहे. 

नवी दिल्ली - 2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र या प्रकरणात आज आलेल्या निकालामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी 2जी घोटाळा प्रकरणात जोरदार आघाडी उघडली होती. आता निकालानंतर आपण न्यायालयाच्या निर्णयामुळे निराश झालेलो नाही. सरकारने निकालाविरोधात उच्च न्यायलात दाद मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वामी यांनी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसलेल्या स्वामी यांनी सीबीआयवर तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. तसेच या अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याबाबतही प्रश्न उपस्थित केले. मात्र या निर्णयानंरही भ्रष्टाचाराविरोधातील आपली लढाई सुरू राहणार असून, आजपासून भ्रष्टाचाराविरोधात युद्धस्तरावर लढण्याचा निर्णय झाला पाहिजे, त्यासाठी मी स्वत: पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी स्वामी यांनी जयललिता यांच्या भ्रष्टाचाराच्या खटल्याचेही उदाहरण देत आपला विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "या निर्णयाविरोधात सरकारने उच्च न्यायालयात दाद मागितली पाहिजे. जयललिता यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही असाच निर्णय आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय पलटवून लावत जयललिता यांना दोषी ठरवले होते." आपण या खटस्याचे निकालपत्र अद्याप वाचलेले नाही. ते वाचल्यानंतर याप्रकरणातील पुढील भूमिका आपण ठरवू असेही त्यांनी सांगितले.  

संपूर्ण देशाला हादरवणा-या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा, डीएमके नेत्या व खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींना आज दोषमुक्त केले. सीबीआयची दोन प्रकरण व  अंमलबजावणी संचालनालयाच्या एका प्रकरणावर गुरुवारी (21 डिसेंबर) सुनावणी झाली.  1 लाख 76 हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात तत्कालीन यूपीए सरकारमधील दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यासह अनेक आरोपी होते.  

 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळाIndiaभारत