शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

29.1 अब्ज डॉलरच्या ‘मालकीण’ करतात पक्षांतर; देशातील सर्वात श्रीमंत महिला भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 06:47 IST

आयाराम गयारामांच्या यादीत सावित्री जिंदाल

राकेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : लोकसभा निवडणुकीचं रण प्रचंड तापले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत आयाराम- गयारामांची चलतीही सुरू झाली आहे. त्याला हरयाणासारखे छोटे राज्यही कसे अपवाद राहणार?. ८४ वर्ष वय असलेल्या आणि तब्बल २९.१ अब्ज डॉलरच्या ‘मालकीण’ आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा भाजप प्रवेश म्हणूनच चर्चेचा विषय ठरला आहे. 

२०२४च्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमांची घोषणा झाल्यानंतर आणि निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची परंपरा यंदाही कायम आहे. आयाराम-गयारामांचा सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाला बसत आहे. पक्षातून दिग्गज नेत्यांची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ‘मोदी परिवारात’ जाणे पसंत केले आहे. यातील विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच सावित्री जिंदाल यांचा मुलगा आणि उद्योगपती नवीन यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुलाच्या पावलावर पाऊल ठेवत सावित्री जिंदाल भाजपवासी झाल्या आहेत.

अमेरिकेपासून चिलीपर्यंत...उद्योग क्षेत्रात जिंदाल समुहाचे नाव ‘टॉप’ ला आहे. ओपी जिंदाल समूहाचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये  विस्तारलेला आहे. लोखंड, ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, गुंतवणूक आणि पेंट आदी क्षेत्रामध्ये जिंदाल समूहाचा व्यवसाय आहे. देशातच नव्हे तर भारताबाहेरही त्यांचा व्यवसाय आहे. अमेरिका, यूरोप आणि यूएईपासून चिलीपर्यंत त्यांचा कारभार विस्तारला आहे. सावित्री जिंदाल हिसार येथील रहिवासी आहेत. सावित्री जिंदाल यांचा जन्म २० मार्च १९५० साली आसाममधील तिनसुकिया येथे झाला. त्यांचे पती ओमप्रकाश जिंदाल हे जिंदाल  उद्योग समूह सांभाळत होते. २००५ मध्ये हरियाणामध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून सावित्री जिंदाल या ग्रुपचे नेतृत्व करत आहेत. त्यांचे पती ओमप्रकाश जिंदाल हे हुड्डा सरकारमध्ये मंत्रीदेखील  होते. सावित्री जिंदाल यांनीही हिसारमधून विधानसभा निवडणूक लढवली होती.चिरंजीव नवीन जिंदाल २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कुरुक्षेत्रातून पहिल्यांदा खासदार बनले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कुरुक्षेत्रातून भाजपचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

अब्जाधीशांच्या यादीत स्थानnयावर्षी ‘फोर्ब्स इंडिया’च्या यादीनुसार सावित्री जिंदल या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. सावित्री जिंदल यांची संपत्ती २९.१ अब्ज डॉलर आहे. जागतिक स्तरावर, सावित्री या जगातील अब्जाधीशांच्या यादीत ५६ व्या स्थानी आहेत. nब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, सावित्री जिंदल यांची एकूण संपत्ती २५ अब्ज डॉलर (२०८४ लाख कोटी रुपये) वर पोहोचली आहे. गेल्या २ वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. २०२० मध्ये फोर्ब्सच्या यादीत ३४९व्या स्थानावर होत्या. यानंतर, सन २०२१ मध्ये २३४ व्या व २०२२ मध्ये ९१व्या क्रमांकावर होत्या.

टॅग्स :lok sabhaलोकसभाchandigarh lok sabha election 2024चंदीगड लोकसभा निवडणूक निकाल २०२४Savitri Jindalसावित्री जिंदालBJPभाजपाHaryanaहरयाणा